आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप मुलींसोबत, भाऊ बहिणींसोबत ठेवत होते शारीरिक संबंध, असा झाला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - बुद्धी आणि संस्कृती भ्रष्ट झाल्यानंतर माणूस किती नीच पातळीला जाऊ शकतो याचे उदाहरण ऑस्ट्रेलियात मिळाले आहे. या ठिकाणी वडील आपल्या मुलीसोबत आणि भाऊ आपल्या बहिणीसोबत सेक्शुअल रिलेशन बनवत होते. एवढेच नव्हे, तर या संबंधांतून त्यांनी मुलांना देखील जन्म घातला होता. 38 जणांचे हे कुटुंब कार, व्हॅन, शेड आणि तंबूंमध्ये राहत होते. प्रशासनाने त्यांच्या छुप्या कॅम्पमधून 12 निरक्षर आणि कुपोषित मुलांना बाहेर काढले. त्यापैकी बहुतांश मुले शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या विकृत होते. सिडनी कोर्टात शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये प्रौढांना कोठडीत आणि लहानग्यांना सुधारगृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


असे समोर आले सत्य...
- सर्वप्रथम 2012 मध्ये या कुटुंबियांचे सत्य समोर आले. यानंतर चिल्ड्रन कोर्टाच्या न्यायाधीशांनी हा खुलासा जगासमोर करण्याचा निर्णय घेतला. 
- ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स येथे हा विचित्र कुटुंब राहत होता. या कुटुंबातील काही मुले शाळेच्या मैदानावर खेळताना घरातील सेक्स लाइफवर चर्चा करत होते. त्यांचे खुलासे ऐकूण सर्वांना धक्का बसला. 
- एक मुलगा आपल्या मित्राला सांगत होता, की त्याची बहिण गर्भवती आहे. पण, कुटुंबियांना हेच माहिती नाही की तिचा कोणता भाऊ त्या मुलाचा बाप आहे. 


पोलिस पोहोचले तेव्हा असे होते दृश्य...

- मैदानावर मुले चर्चा करत होती, तेव्हा काहींनी ते संपूर्ण चर्चा ऐकली आणि पोलिसांत याची माहिती दिली. यानंतर पोलिस त्या कुटुंबाच्या फिरत्या कॅम्पमध्ये पोहोचले. तेव्हा घरातील परिस्थिती पाहून पोलिस सुद्धा हैराण झाले. 
- पोलिसांनी जेव्हा घराची पाहणी केली, एक तरुण कपल बेडवर पती-पत्नीप्रमाणे झोपले होते. त्यांची चौकशी केली असता ते सख्खे भाऊ-बहिण निघाले.
- त्यांच्या कॅम्पमध्ये टॉयलेट आणि बाथरुम तर सोडाच त्या पाणी सुद्धा उपलब्ध नव्हते. तंबूच्या शेजारी काही बकेट होत्या. पण, त्या सर्व बकेट पाणी नव्हे, तर लघवीने भरलेल्या होत्या.  
- याच ठिकाणी पकडलेल्या अल्पवयीन मुला-मुलींनी पोलिसांना तेथे सुरू असलेल्या लैंगिक अत्याचारांचे किस्से सांगितले. गेल्या कित्येक पिढ्यांपासून हे कुटुंब वाट्टेल महिला आणि पुरुषांवर अत्याचार करत होते. 
- कुटुंबात 4 ते 5 पिढ्या होत्या. त्यातील बाप आपल्या मुलींसोबत आणि भाऊ आपल्या बहिणींसोबत सेक्शुअल रिलेशन ठेवत होते. कोण कुणाचा काय आहे, याचा काहीच पत्ता नव्हता. हे ऐकूण पोलिसांचेही डोके सुन्न झाले होते.
- या कुटुंबातील सेक्शुअल रिलेशन्समध्ये अवघ्या 12 वर्षीय मुला-मुलींचाही समावेश होता. अनेक अल्पवयीन मुला-मुलींनी घरातील प्रौढ बळजबरी आपले लैंगिक शोषण करत होते असा आरोप लावला आहे.
- फॅमिलीनेच पोलिसांसमोर अनैतिक संबंधांची कबुली दिली. एवढेच नव्हे, तर हा प्रकार गेल्या शतकापासून सुरू होता आणि आजही 4 पिढ्यांमध्ये तेच प्रकार सुरू आहेत. सध्या कुटुंबातील प्रमुख असलेली महिला जून कॉल्ट सुद्धा एका भाऊ आणि बहिणीच्या संबंधातून जन्मली होती. 


कॅम्पमधून काढली अशी मुले-मुली
- येथून काढण्यात आलेली मुले आणि मुली शारीरिक आणि मानसिक विकृत होती. त्यांना व्यवस्थित बोलता देखील येत नव्हते. त्यांचे दात काळवंडले होते. त्यांची अवस्था इतकी घाणेरडी होती, की त्यांना टॉयलेट केल्यानंतर स्वच्छ करावे लागते याची सुद्धा माहिती नव्हती. 
- कॅम्पमध्ये गाद्या फाटलेल्या होत्या. तसेच सिगारेटचे डाग आणि मलमूत्राचा उग्र वास येत होता. काही बेडवर तर जनावरे सुद्धा येऊन झोपायची. 
- त्यापैकी एका मुलाला नीट चालता येत नव्हते. त्याला त्वचेचा गंभीर आजार होता. दुसऱ्या एका मुलाला ऐकू येत नव्हते. तर काहींना व्यवस्थित दिसत नव्हते. 


फॅमिली सेक्समुळे झाली अशी अवस्था
त्या सर्व मुलांना उपचारासाठी रुग्णालय आणि सुधारगृहांमध्ये पाठवण्यात आले. त्याच ठिकाणी त्यांच्यावर विविध चाचण्या झाल्या. त्यातून ते एकाच कुटुंबात सेक्समुळे जन्मल्याने त्यांच्या अनुवांशिक दोष आला असे निष्पन्न झाले. अर्थातच ते एकाच वडिलांची मुले-मुली होती. जीन पॅटर्न एकच असल्याने असे झाले होते. काही महिलांनी आपल्या मुलांचे बाप प्रवाशी आणि परदेशी असल्याचा दावा केला. पण, तो दावा डीएनए चाचणीत खोटा निघाला. विशेष म्हणजे, हे ज्या ठिकाणी शिबीर टाकून राहत होते. तेथील शेजारी आणि शेतकऱ्यांना सुद्धा यासंदर्भातील कुठलीही माहिती नव्हती. ते कुणाशीही चर्चा करत नव्हते.


पुढील स्लाइड्सवर पाहा, पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा असे होते दृश्य...

बातम्या आणखी आहेत...