आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातून परदेशात गेले हे Gypsy; आता इतके श्रीमंत, पाहा त्यांची LifeStyle

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशल डेस्क - भारतातून अनेक लोक विदेशात गेले आणि तेथेच स्थायिक झाले आहेत. असाच एक समाज आहे जो यूरोपात राहतो. ज्यांची नाळ भारताशी जुळलेली आहे. यूरोपातील हा समाज तेथील मायनॉरिटी ग्रुप म्हणून ओळखला जातो त्यांना रोमा समाज म्हटले जाते. या समुदायाचे जवळपास एक कोटी लोक यूरोपात राहात आहेत. ही जमात कायम फिरस्ती असल्याने त्यांना जिप्सी ही देखील म्हटले जाते. ते संपूर्ण यूरोपात पाहायला मिळतात.

 

भारतातून गेले होते यूरोपात
>> रोमा समुदाय भारताशी संबंधीत असल्याचे नुकतेच 'करंट बायोलॉजी' नावाच्या नियतकालिकाने केलेल्या संशोधनातूही सिद्ध झाले आहे. 
>> ते भारतातील उत्तर आणि उत्तर पश्चिम परिसराशी संबंधीत लोक आहेत.
>> ते 1500 वर्षांपूर्वी इराणमध्ये पोहोचले होते, त्यानंतर 15 व्या शतकात इराणमार्गे यूरोपात गेले. 
>> सध्या त्यांची यूरोपातील संख्या एक कोटींच्या आसपास आहे. त्यापैकी बहुतांश लोकांना येथे काम आणि घर मिळाले असून ते आता श्रीमंत झाले आहेत.
>> मात्र ते संपूर्ण यूरोपात पसरलेले असल्यामुळे त्यांचे डाटा कलेक्शन सोपे नाही. 
>> शेकडो वर्षांपासून यूरोपात राहात असताना आजही त्यांच्यासोबत भेदभाव होतो.


यूरोपात कुठे आहे हा समूदाय 
सेंट्रल आणि इस्टर्न यूरोपातील बुल्गेरिया, युगोस्लाव्हिया, मॅसेडोनिया, स्लोव्हाकिया, रोमानिया, सर्बिया आणि हंगेरी या भागात रोमा समुदायाचे लोक आढळून येतात.

 

पुढील स्लाइड्वर वाचा, त्यांच्याविषयी आणखी सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...