आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातून युरोपात गेले होते हे भटके, आता जगताहेत अशी LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ही छायाचित्रे रोमानियाच्या क्लूज शहरातील एका नाट्यगृहाची आहेत. रोमा समुदायासोबत होणाऱ्या भेदभावाचे दर्शन घडवण्यासाठी हा नाटक सादर केला जात आहे. रोमा युरोपातील एक असा समुदाय आहे, ज्यांचा संबंध थेट भारताशी आहे. युरोपातील प्रत्येक देशात या समुदायाला भेदभावाला सामोरे जावे लागते. 

 

- हे रोमानियाच्या फेमिनिस्ट रोमा थिएटर कंपनीचे पहिले नाट्य होते. ते रोमानी भाषेतच सादर करण्यात आले. देशातील 20 लाख लोक याच भाषेचा वापर करतात. 
- रोमानियातील कलाकारांनी सांगितल्याप्रमाणे, येथील कलाकार नेहमीच अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात. कलेला सुद्धा वाव नाही. अनेक प्रकारच्या कला आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 
- रोमानिया युरोपातील सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. त्यांना रोमा अशा नावानेही ओळखल्या जाते. या समुदायाचे अख्ख्या युरोपात जवळपास एक कोटी लोक आहेत. 
- यापैकी बहुतांश लोक उत्तर युरोपच्या बुल्गारिया, युगोस्लाव्हिया, मॅसेडोनिया, स्लोव्हाकिया, रोमानिया, सर्बिया आणि हंगेरी येथे राहतात. त्यांनी स्थानिक भाषेत जिप्सी (भटके) असेही म्हटले जाते. 
- नाझीवादात होणाऱ्या अत्याचारांमध्ये जवळपास 5 लाख रोमानियांनी आपला जीव दिला. इतक्या वर्षांपासून आणि युरोपियन देशांच्या स्थापनेत सहभाग असतानाही या समुदायासोबत भेदभाव केला जातो. 
- या समुदायात बालविवाह सामान्य मानला जातो. अवघ्या 11 वर्षीय मुलींचेही विवाह लावले जातात. 
- करंट बायोलॉजी नामक पुस्तकातील एका संशोधनानुसार, रोमा समुदायाचा संबंध थेट भारताशी आहे. भारतातूनच ते युरोपात गेले होते. 
- उत्तर आणि पश्चिम भारताशी संबंधित रोमा 1500 वर्षांपूर्वी इराणला गेला. तेथूनच 15 व्या शतकात ते युरोपात पोहोचले. 
- हे सगळेच हिंदू धर्मीय होते. पण, इराण आणि तेथून युरोपात जाताना त्यांचे धर्म बदलले. त्यामध्ये आता ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मीय लोक आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या समुदायाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...