आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक चूक नडली... 20 वर्षांच्या कैदेला सामोरे जातेय ही Hot डीजे, मॉडेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सिंगापूरची डीजे आणि मॉडेल डेबी व्हॅलेरी लाँग उर्फ टेनाशर तब्बल 20 वर्षांच्या कैदेला सामोर जात आहे. तिच्या विरोधात अंमली पदार्थांचे सेवन, तस्करी आणि त्याच्याशी संबंधित गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. 32 वर्षीय डिस्क जॉकी (DJ) डेबी हिच्यावर आरोप सिद्ध झाल्यास तिला आपल्या आयुष्याची 2 दशके तुरुंगातच घालावी लागणार आहेत. 


असे आहे प्रकरण?
- हे प्रकरण सर्वप्रथम 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आले. 2015 मध्ये डेबी आणि तिचा त्यावेळी प्रियकर राहिलेला 44 वर्षीय ब्रिटिश थॉर्स्टन यांची सिंगापूरच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली. त्यांना सिंगापूरच्या चांगी विमानतळावर अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती. 
- सिंगापूर आणि आंतरराष्ट्रीय मॅगझीन्सच्या कव्हर पेजवर झळकलेली डेबी सध्या चांगी येथील महिला कारागृहात आहे. त्याच प्रकरणाची सुनावणी आता झाली असून तिने व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात हजेरी लावली. या प्रकरणातील पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे. 
- कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रांमध्ये तिच्या विरोधात अमली पदार्थ तस्करी, प्रतिबंधित औषधींचे सेवन, अमली पदार्थांचे सेवन आणि इतर आरोप लावण्यात आहेत. त्यापैकी अमली पदार्थांच्या सेवनाचे आरोप सिद्ध झाल्यास तिला 10 वर्षांची कैद होईल. तसेच अमली पदार्थ तस्करीचे आरोप सिद्ध झाल्यास आणखी 10 वर्षांची कैद अशी 2 दशके तिला तुरुंगातच व्यतीत करावी लागणार आहेत. 
- सोबतच सिलोसीन नावाचे प्रतिबंधित रसायनच्या तस्करी प्रकरणात तिला अतिरिक्त 20 वर्षांची कैद होऊ शकते. कायद्यानुसार, तिला जामीनासाठी 22 हजार अमेरिकन डॉलरची ऑफर देण्यात आली होती.


पुढील स्लाइड्सवर पाहा, डेबीचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...