आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडचा पती बनला रॉकस्टार रिकी मार्टिन, 2 वर्षांपासून सुरू होते अफेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - प्रसिद्ध इंटरनॅशनल सिंगर रिकी मार्टिनने 2018 मध्ये आपल्या चाहत्यांना धक्का दिला. त्याने आपला बॉयफ्रेंड यावर युसूफशी समलैंगिक विवाह केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रिकी मार्टिन आणि यावर यांचे अफेअर सुरू होते. त्यांनी नवीन वर्षाच्या दुसऱ्याच आठवड्यात विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. रिकी मार्टिन जगजाहीर समलैंगिक सेलिब्रिटींपैकी एक आहे. 

 

- 46 वर्षीय रिकीने 2016 मध्ये युसूफसोबत डेटिंग सुरू केले होते. 33 युसूफ वर्षीय युसूफ मूळचा सीरियन असून स्वीडनमध्ये कलाकार आहे. 
- रिकी आणि युसूफने नोव्हेंबरमध्येच एंगेजमेंट केली होती. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून ते लॉस एंजेलिस येथील घरात राहत आहेत. 
- रिकी मार्टिन याने एका खासगी माध्यमाशी संवाद साधताना आपण पती झाल्याचा गौप्यस्फोट केला. 
- त्याने आपले आणि युसूफचे लग्न कधी झाले, याची तारीख जाहीर केली नाही. 
- येत्या काही महिन्यात आपण धडाकेबाज सेलिब्रेशन करणार आहोत असे रिकी मार्टिनने सांगितले आहे. 
- अधिकृत लग्नासाठी दोघांनी कागदांवर स्वाक्षऱ्या देखील केल्याचे त्याने जाहीर केले आहे. 
- रिकी मार्टिन एक इंटरनॅशनल सिंगर आहे. त्याला आपल्या गाण्यांबद्दल दोन ग्रॅमी अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. 
- लॅटिन अमेरिकेतील सर्वात लोकप्रीय कलाकारांपैकी तो एक आहे. त्याने समलैंगिक असल्याचा खुलासा केला, तेव्हा करोडो फीमेल फॅन्सला शॉक दिला होता.

बातम्या आणखी आहेत...