आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS दहशतवाद्यांच्या 40 बायकांना फाशी, कोर्टाने 10 मिनिटांत दिला निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगदाद - इराकला आयसिसमुक्त घोषित केल्यानंतर येथील सरकार उरलेले दहशतवादी, त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांना शोधून कोर्टात सादर करत आहे. त्यापैकीच 40 महिलांना पोलिसांना कोर्टासमोर आणले. या सर्व महिला इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेच्या सदस्यांच्या पत्न्या होत्या. कोर्टाने अवघ्या 10 मिनिटांतच सुनावणी संपवून सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली     आहे. या सर्वांवर आपल्या दहशतवादी पतींना समर्थन दिल्याचे आरोप होते. तसेच या सगळ्याच विविध शहर आणि देशांतून खास आयसिस सदस्यांच्या पत्नी होण्यासाठी इराक आणि सीरियाला गेल्या होत्या. त्यापैकीच काही तरुणींचे युक्तीवाद ऐकूण त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


- आयसिस सदस्यांची मदत करण्याच्या आरोपात जवळपास 1000 महिला आणि तरुणी सध्या इराकच्या तुरुंगांमध्ये कैद आहेत. त्यापैकीच 40 जणींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 
- शिक्षा मिळवलेल्यांपैकी बहुतांश महिला ह्या दहशतवाद्यांच्या विधवा आहेत. त्या आपल्या मुलांसाठी एकमेव आधार आहेत. ब्रिटिश दैनिक गार्डियनच्या वृत्तानुसार, काही महिला आपल्या मुला-मुलींसह कोर्टात हजर होत्या.
- बगदादच्या कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये सर्वांनीच आपण निर्दोष पीडित असल्याचा दावा केला. काहींनी आपली दिशाभूल करण्यात आली. तर काहींनी आपला पती दहशतवादी असल्याचे नंतर कळाले असा दावा केला.


परदेशी महिलांचाही समावेश
- या महिलांमध्ये फ्रेन्च नागरिक जॅमिला बुटोटो हिचा देखील समावेश आहे. कोर्टात तिने सांगितल्याप्रमाणे, "मला वाटले माझा विवाह एका रॅपरशी झाला. पण, तुर्कीत गेल्यानंतर कळाले की तो प्रत्यक्षात एक दहशतवादी आहे." 
- तिने कोर्टात दावा केला की आपण आरोपी नसून एक पीडित आहोत. "दहशतावादी असल्याचे कळाल्यानंतर मी त्याचे काहीच ऐकत नव्हते. तेव्हा तो मला खूप मारहाण करायचा. मला आणि माझ्या मुला-मुलींना त्याने एका गुहेत कैद केले होते."
- आयसिसचा सदस्य किंवा पत्नी होण्यासाठी फ्रान्सवरून तब्बल 1900 नागरिक सीरिया आणि इराकला गेले होते. जॅमिला त्यापैकीच एक आहे. असेच विविध देशांतून एकूण 40,000 परदेशी नागरिक इराक आणि सीरियात गेले होते. 2011 पासून 3 वर्षे इराक आणि सीरियाच्या मोठ्या भूखंडावर आयसिसचा ताबा होता. 


शिक्षा सुनावली तेव्हा...
शिक्षा सुनावलेल्यांपैकी अनेक जणी आपल्या मुलांच्या सिंगल पॅरेन्ट होत्या. त्यांना कोर्टाने जेव्हा मृत्यूदंड आणि जन्मठेप सुनावली तेव्हा त्या सगळ्याच गुडघ्यांवर बसून न्यायाधीशांसमोर रडत होत्या. कोर्टाने किमान या लहान मुलांवर दया दाखवून आमची शिक्षा माफ करावी आम्ही स्वतः पीडित आहोत असे त्या म्हणत होत्या. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...