आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींनी 4 वर्षांत 8 वेळा केले शिष्टाचार मोडून राष्ट्राध्यक्षांचे स्वागत; संबंध जपण्यासाठी पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे शिष्टाचार मोडून स्वागत केले. त्यांनी ८ वेळा राष्ट्राध्यक्षांचे असे स्वागत केले आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी तीनदा शिष्टाचार मोडून राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले.


मोदींनी सर्वात आधी जिनपिंग यांचे केले स्वागत  
सप्टेंबर २०१४ :
मोदींनी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे शिष्टाचार मोडून स्वागत केले. 
जानेवारी २०१५ : राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचे स्वागत केले.  
डिसेंबर २०१५ : जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबेंचे बनारसमध्ये स्वागत केले.  
जानेवारी २०१६ : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांचे चंदिगडमध्ये स्वागत केले.  
जानेवारी २०१७ :  अबुधाबीचे प्रिन्स शेख मोहंमद बिन जायद अल नहयान यांचे स्वागत केले.  
एप्रिल २०१७ : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे दिल्लीत स्वागत केले.  
जुलै २०१७ : जपानी पीएम अॅबेंसोबत अहमदाबादेत रोड शो.  
जानेवारी २०१८ : १५ वर्षांनंतर भारतात आलेल्या इस्रायली पंतप्रधानांचे स्वागत.  


माेदींच्या स्वागतासाठी यांचाही शिष्टाचार बाजूला  
- मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना नीतोंनी गाडी चालवत मोदींना रेस्तराँमध्ये नेले.  
- २०१५ मध्ये यूएएई दौऱ्यात प्रिन्स शेख मो.बिन जायद अल नाहयान यांनी स्वागत केले हेाते.  
- २०१७ मध्ये ढाक्यात शेख हसीना यांच्याकडून स्वागत.  
- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शिष्टाचार मोडून मोदींना गृहनगर शियानमध्ये नेले.  

 

- वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नेतन्याहूंचे स्वागत करण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचले होते. तसेच मोदींनी नेतन्याहूंची गळाभेट घेतली. 
- पीएम मोदी आणि त्यांचे इस्रायली समकक्ष बेंजामिन नेतन्याहू जेव्हा हायफा चौक परिसरात पोहोचले तेव्हा दोन्ही नेत्यांनी विझिटर्स बुकवर स्वाक्षऱ्या केल्या. 
- मोदी आणि नेतन्याहू सोमवारी हैदराबाद हाऊसमध्ये बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. त्यामध्ये पॅलेस्टाईन, जेरुसलेम, मध्यपूर्व अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...