आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर आम्ही सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद यांना ठार मारू, इस्रायलने दिली खुलेआम धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल अवीव - इराणसोबत वाद वाढत असतानाच इस्रायलने सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांना ठार मारण्याची उघडपणे धमकी दिली आहे. इराण सीरियाच्या जमीनींना आपले हवाई तळ समजून आमच्यावर हेरगिरी करत आहे. सीरियाने इराणला असे करण्यापासून रोखले नाही, तर आम्ही (इस्रायल) सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना ठार मारू असे इस्रायलच्या केंद्रीय मंत्र्यांनी धमकावले आहे. इस्रायलचे ऊर्जा मंत्री एका मुलाखतीमध्ये बोलत होते. 

 

इस्रायल इराणला आपला सर्वात मोठा शत्रू मानतो. इराण आणि P5+1 देशांमध्ये झालेला ऐतिहासिक नागरी अणु करार कुठल्याही परिस्थितीत रद्द व्हावा असा हट्ट इस्रायलने धरला आहे. इराणने या कराराच्या आड अणुबॉम्ब तयार केला असा दावा इस्रायलने केला आहे. विशेष म्हणजे, इस्रायलच्या या दाव्याला खरे मानत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करार रद्द करण्यासाठी ब्रिटन आणि इतर देशांसोबत चर्चा देखील सुरू केली. 


काय म्हणाले इस्रायलचे ऊर्जा मंत्री 
इस्रायलचे ऊर्जा मंत्री युवल स्टेनित्झ पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. स्टेनित्झ एका मुलाखतीमध्ये म्हणाले, “असद यांनी सीरियाच्या जमीनी वापरण्यापासून इराणला रोखले नाही. तर त्यांना माहिती असायला हवे की त्यांचा अंत जवळ आहे. असद यांनी हातावर हात ठेवून नुसते पाहत राहावे आणि इराणने त्यांच्या जमीनींचा वापर इस्रायलवर हल्ल्यांसाठी करावा हे इस्रायल मुळीच खपवून घेणार नाही. असद यांनी इराणला रोखले नाही तर आम्ही असदला सत्तेतून दूर फेकू आणि ठार मारू.”

बातम्या आणखी आहेत...