आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्फाळ झाला जगातील सर्वात उष्ण वाळवंट, थंडीचा असाही कहर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात थंडीचा प्रकोप सुरू आहे. कित्येक देशांमध्ये तापमान -50 डिग्री सेल्सियसच्या खाली गेले आहे. विशेष म्हणजे, या थंडीने जगातील सर्वात मोठे आणि उष्ण असे सहारा वाळवंट सुद्ध बर्फाळ केले आहे. या वाळवंटात सध्या 18 इंच जाड अशी बर्फाची चादर पसरली आहे. 

 

40 वर्षांतील पहिलीच घटना...
- जगभरात पडणाऱ्या थंडीचा अंदाज सहारा वाळवंटाच्या या छायाचित्रांवरून लावला जाऊ शकतो. हे वाळवंट बर्फ होण्याची 40 वर्षांतील ही दुसरी घटना आहे. नॉर्थ आफ्रिकेतील काही छायाचित्रकारांनी त्याचे फोटोज क्लिक केले आहेत. 
- सहारा वाळवंटात असलेल्या ऐन सेफ्रा येथील स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या 37 वर्षांत या ठिकाणी बर्फ स्नो फॉल झाला नव्हता. अचानक येथील वाळूच्या डोंगरांवर बर्फ पडत असल्याचे पाहून सगळेच हैराण झाले. 
- बर्फ पडण्याची ही प्रक्रिया अजुनही सुरूच आहे. आता या भागात 18 इंच जाड अशी बर्फाची चादर पसरली आहे. 
- जगातील सर्वात उष्ण वाळवंट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या सहारा वाळवंटात यापूर्वी 1979 मध्ये हा नजारा पाहण्यात आला होता. 
- संशोधकांच्या मते, सहारा वाळवंट दुष्काळी भाग असला तरीही 15 हजार वर्षात तो पुन्हा हिरवागार होणार आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बर्फ झालेल्या सहारा वाळवंटाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...