आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडला Wish करण्यासाठी विद्यापीठाची वेबसाइट Hack! लिहिले, \'हॅप्पी बर्थ-डे पूजा\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीचे अधिकृत संकेतस्थळ सोमवारी रात्री उशीरा हॅक करण्यात आले. तसेच हॅकरने या वेबसाइटच्या होमपेजवर हॅपी बर्थ-डे पूजा असे लिहिले. अद्याप कुठल्याही हॅकरने याची जबाबदारी घेतलेली नाही. तसेच विद्यापीठाकडूनही काहीच प्रतिक्रिया नाही. याच वर्षाच्या सुरुवातीला गृह, संरक्षण, आणि कायद्यासह कामगार मंत्रालयावर सायबर हल्ले झाले होते.


सकाळपर्यंत वेबसाइट अशीच...
युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर ब्लॅक बॅकग्राउंडमध्ये 'हॅप्पी बर्थ-डे पूजा' असे लिहिण्यात आले होते. त्याखाली 'यॉर लव्ह' (तुझाच प्रियकर) असा उल्लेख होता. सकाळी साडे सातच्या सुमारास ही वेबसाइट दुरुस्त करण्यात आली. वेबसाइट मेनटेन करणारी संस्था नॅशनल इनफॉर्मेशन सेंटर (एनआयसी)ने यास तांत्रिक चूक म्हटले आहे. 

 

10 महिन्यांत 22,207 सायबर हल्ले
- गेल्या काही दिवसांत देशात प्रमुख संस्था आणि संघटनांच्या वेबसाइट हॅक करण्यात आल्या. त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) आणि इंडियन स्पेशल फोर्स यूनिट कॉम्बेटिंग टेरर अॅक्टिव्हिटी यांच्या वेबसाइटचा देखील समावेश होता. तर याच वर्षाच्या सुरुवातीला गृह आणि संरक्षण विभागाच्या संकेतस्थळांवर सुद्धा सायबर हल्ले करण्यात आले आहेत. 
- लोकसभेत जारी केलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2017 पासून जानेवारी 2018 पर्यंत 22,207 वेबसाइट हॅक करण्यात आल्या आहेत. यापैकी 114 वेबसाइट सरकारी होत्या. कॉम्युटर इमरजेंसी रिस्पाँस टीमने या दरम्यान मोठ्या धोक्यांवर 301 सिक्यॉरिटी अॅलर्ट जारी केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...