आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये भ्रष्टाचाऱ्यांनी अशी वाकून मागितली जनतेची जाहीर माफी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोक्यो - भारतात कर्जबुडवे आणि बँकांना चुना लावणारे लोक परदेशात पळून जात आहेत. तसेच पैसे परत करणार नसल्याचे सांगत उलट बँकांना धमक्या देत आहेत. अशात जपानने जगापुढे एक उदाहरण प्रस्तुत केले आहे. जपानमध्ये जे काही झाले ते भारतातही शिकण्यासारखे आहे. जपानची कोबे स्टील कंपनी जगभरात नावाजलेली कंपनी आहे. मात्र, उत्पादनाच्या गुणवत्तेशी गेल्या काही वर्षांपासून छेडछाड होत असल्याचे आरोप लागले. ही गोष्ट जेव्हा जनतेसमोर आली तेव्हा कंपनीचे चेअरमन आणि सीईओ हिरोया कावासाकी यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

- कोबे ब्रॅन्डने जगभरात जवळपास 700 कंपन्यांना स्टील, कॉपर आणि अॅलुमिनियम पुरवठा केला होता. यांचा वापर बोइंग, एयरबसच्या विमानांसह जनरल मोटर्सच्या महागड्या वाहनांमध्ये करण्यात आला. कारच्या इंजिनपासून मॅकव्हील आणि बुलेट ट्रेनमध्ये सुद्धा या कंपनीचा धातू वापरला जातो. 
- 2013 मध्ये कंपनीत जॉइन झालेले कावासाकी यांचा राजीनामा 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यांनी जनतेची हात जोडून आणि वाकून माफी मागितली. ते म्हणाले, 'आमच्यामुळे लोकांना खूप प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. आता नव्या हातांमध्ये कंपनी सोपविण्याची वेळ आली आहे.' कंपनीने माध्यमांशी संवाद साधून अनेक बड्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे सांगितले आहे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, पंतप्रधान शिनझो अॅबे येथील माजी कर्मचारी...

बातम्या आणखी आहेत...