आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरुसलेम प्रकरण: इस्रायलचा गाझा पट्ट्यात रॉकेट हल्ला; 2 पॅलेस्टिनींचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझा सिटी- इस्रायलची जेरुसलेम नवीन राजधानी असेल या डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर संतापाची लाट उसळली. शनिवारी पॅलेस्टाइन समर्थकांनी निदर्शने  आणि दगडफेक केली, तर गाझा पट्ट्यात इस्रायलने हमासच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. ट्रम्प यांच्या घोषणेच्या वादानंतर उडालेल्या संघर्षात आता मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या ४ झाली आहे.  


हमास या लष्करी शाखेच्या तळावर पहाटेच इस्रायलच्या हवाई दलाने हल्ला केला. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. दक्षिणेकडील इस्रायली वस्तीवर हल्ला झाला होता. त्याच्या प्रत्युत्तरात रॉकेट हल्ला केल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे वेस्ट बँक भागात पॅलेस्टाइन समर्थकांनी निषेध सुरूच ठेवला असून इस्रायलच्या सैनिकांवर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने रबरी गोळ्या झाडल्या. त्याचबरोबर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्यात अनेक आंदोलक जखमी झाले होते. शुक्रवारी नमाजनंतर वेस्ट बँक, गाझा पट्टा व जेरुसलेममध्ये ठिकठिकाणी हिंसक आंदोलन करण्यात आले.  शनिवारी झालेल्या धुमश्चक्रीत दोन जणांना प्राण गमावावे लागले होते. त आता त्यात हमास नेता इस्माईल हनिया याने मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. 


गाझा-इस्रायल सीमेवर सुमारे ४ हजार ५०० पॅलेस्टाइन हल्लेखोर दडून हिंसाचार करत असल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला.  जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकचा हा एकतर्फी निर्णय मान्य नाही, असे मत सुरक्षा परिषदेतील बहुतांश सदस्यांनी व्यक्त केले.  राजदूत कार्यालय जेरूसलेमला हलवणे हा सामान्य निर्णय आहे, असे अमेरिकेच्या प्रतिनिधी निकी हेली म्हणाल्या.

 

सुरक्षा परिषदेत अमेरिका एकाकी  
जेरुसलेम राजधानी घोषित करण्याच्या प्रकरणात अमेरिका संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पूर्णपणे एकाकी पडल्याचे दिसून आले. शुक्रवारी परिषदेची बैठक झाली. त्यात १४ सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी ट्रम्प यांची घोषणा योग्य नसल्याचे स्पष्ट करत नाराजी व्यक्त केली. एरवी सुरक्षा परिषदेत नेहमीच वरचढ राहणाऱ्या अमेरिकेला पहिल्यांदाच एखाद्या प्रकरणात एकाकी पडावे लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...