आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टर शत्रू इस्रायली-पॅलेस्टीनी, या जागेवर एकत्रित येऊन करतात Enjoy

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इस्रायल आणि पॅलेस्टाइन एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करणे रोजच्याच घटना आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त शहर जेरुसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करण्यावरून सध्या यांच्यात आणखी वाद सुरू आहेत. इस्रायली आणि पॅलेस्टीनी एकमेकांचे कट्टर शत्रू असले तरीही एक ठिकाण आहे, जेथे हे दोघांची संघर्ष शांत होतो. ते ठिकाण आहे कालिया बीच...

 

- इस्रायलच्या सीमेवर डेड सीच्या उत्तरेकडील परिसरात जगातील सर्वात खालच्या ठिकाणांपैकी एक आहे. या जागेला कालिया बीच म्हणून ओळखल्या जाते.
- या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे इस्रायली आणि पॅलेस्टीनी एकत्रित येऊन मस्ती करतात. राजकीयदृष्ट्या सुरू असलेले वाद या ठिकाणी दिसत नाहीत. 
- 1967 पासूनच या बीचवर इस्रायलचे नियंत्रण आहे. येथे अजुनही इस्रायलचे सैनिक तैनात आहेत. विविध ठिकाणी बिकीनीमध्ये इस्रायलच्या सशस्त्र फीमेल सोल्जर्स देखील दिसून येतात. 


एकमेकांशी गप्पा-गोष्टी...
या बीचवर येणारे इस्रायली आणि पॅलेस्टीनी केवळ एकत्रित येत नाहीत तर एकमेकांसोबत गप्पा-गोष्टी देखील करतात. सोबतच सन टॅन आणि सागरी किनाऱ्यावर लहरींची मजा लुटतात. इस्रायल आणि पॅलेस्टीनींमध्ये वाद सुरू असल्याची काहीच चिन्हे येथे दिसत नाहीत. येथे येणाऱ्या लोकांच्या मते, राजकीय नेत्यांनीच आपल्या स्वार्थासाठी इस्रायल आणि पॅलेस्टाइनचे वाद सुरू केले. प्रत्यक्षात नागरिकांमध्ये एकमेकांविषयी द्वेष भावना नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...