आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची धाकटी बहीण दक्षिण कोरियाला जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल- उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची धाकटी बहीण किम यो जोंग प्योंगचेंग हिवाळी ऑलिम्पिकसाठी या आठवड्यात द. कोरियाला जाणार आहे. किम यो जोंग द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेई इन यांची भेट घेऊ शकतात. आपल्या भावाचे खासगी पत्र त्या मून यांना देण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाने बुधवारी याविषयी माहिती दिली. सत्तारूढ वर्कर्स पार्टीच्या वरिष्ठ सदस्य किम यो जोंग शुक्रवारी प्योंगचेंगला जाणाऱ्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळात सामील आहेत. या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम योंग नाम करतील. 


सेऊलमधील उ. कोरियन अभ्यास केंद्राचे प्रोफेसर यांग मू जिन यांनी सांगितले की, किम परिवारातील एक सदस्य इतिहासात प्रथमच दक्षिण कोरियाला 
येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...