आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम जोंगने 5 स्टार हॉटेलात राहूनही वापरले नाही Toilet, या गोष्टीची होती भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची बहुप्रतीक्षित भेट अखेर संपन्न झाली. सिंगापूरच्या कॅपेला हॉटेलात मंगळवारी दोघांनी 70 वर्षांचे शत्रुत्व विसरून अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू केला. किम जोंग उन यांनी आपला सर्वात मोठा शत्रू राष्ट्र अमेरिकेला मित्र बनवण्यासाठी सिंगापूर दौरा केला यात शंका नाही. परंतु, किम अजुनही कुठल्याही देशावर विश्वास करत नाहीत याचा खुलासा एका प्रकारावरून झाला आहे. किम जोंग उन ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलचे टॉयलेट त्यांनी वापरलेच नाही. परदेशात जाताना ते नेहमी आपल्यासोबत एक वेगळे टॉयलेट सीट घेऊन जातात. सिंगापूर दौऱ्यातही त्यांनी असेच केले. 

 

हे होते कारण...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन रविवारी तीन विमाने घेऊन सिंगापूरला पोहोचले. प्लेन IL76, एयर चायना बोइंग 747 आणि इल्यूशिन IL62 मध्ये विशिष्ट प्रकारच्या जेवनाचे पॅकेट्स, बुलेटप्रूफ लिमोझीन कार आणि पोर्टेबल टॉयलेट सीट इत्यादींचा समावेश होता. 
- इतर देशांचे गुप्तहेर हॉटेलच्या टॉयलेट सीटमधून आपली विष्ठा चोरतील आणि त्यावरून आपली हेरगिरी करतील असा संशय त्यांना वाटतो. विष्ठेवर विविध प्रयोग करून हेरगिरी केली जाई शकते असे किम यांना वाटते.
- एकेकाळी नॉर्थ कोरिया गार्ड यूनिटचा भाग राहिलेले ली यून क्योल यांनी सांगितल्याप्रमाणे, हुकूमशहाने 2011 मध्ये सत्ता सांभाळल्यानंतर त्याचा हा तिसरा परदेश दौरा आहे. कुठल्याही देशात जाताना हुकूमशहा आपल्यासोबत आपली टॉयलेट सीट सुद्धा घेऊन जातो.
- तो प्रत्येकवेळा बाहेर पडत असताना आपल्यासोबत अशा तज्ञांना ठेवतो जे 24 तास त्याच्या शारीरिक हालचालींवर नजर ठेवतात. आरोग्यात बिघाड होताच आपल्याला उपचार मिळेल अशी व्यवस्था त्याने केली आहे. सोबतच तो आपले मल कुठेही सोडून जात नाही. मल-मूत्र सोडल्याने शत्रू राष्ट्र त्याची चाचणी करतील. त्यातून आरोग्याच्या समस्या त्यांच्या लक्षात येतील आणि आपल्या कमकुंवत बाजू समजून हल्ल्याचा कट रचला जाईल अशी भिती त्याला आहे. 


इतका भित्रा आहे हुकूमशहा...
- दक्षिण कोरियन दैनिक चोशुन इल्बोच्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांना वाटते की आपण विमानाने गेलो तर विमान उडवले जाईल. त्यामुळे सिंगापूरला जाताना सुद्धा त्यांनी एक दोन नव्हे, तर तीन विमानांनी प्रवास केला. 
- यावेळी त्यांनी शांघायमार्गे प्रवास केला नाही. कारण, येथून जाताना सागरी मार्ग ओलांडावा लागतो आणि सागरी मार्गे सुरक्षा सुनिश्चित केली जाऊ शकत नाही. त्यामुळेच, त्यांनी बीजिंगमार्फे सिंगापूर जाण्यचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना 10 तास लागले. तसेच पैसा सुद्धा जास्तीचा गेला. 
- या व्यतिरिक्त उत्तर कोरियाची खराब आर्थिक परिस्थितीने किम यांना बीजिंगकडून विमान घ्यावे लागले. संयुक्त राष्ट्रकडून उत्तर कोरियावर इतके निर्बंध आहेत, की कुठलाही देश त्यांना विमान, शिप किंवा क्रू देऊ शकत नाही. तरीही चीनने तसे केले.

 

बातम्या आणखी आहेत...