आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम चीनच्या विमानाने 2 दिवस आधीच दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या लिमोझीन ताफ्यात ट्रम्प विमानतळावरून हॉटेलच्या दिशेने रवाना झाले असा दावा रशिया टुडेने केला. - Divya Marathi
या लिमोझीन ताफ्यात ट्रम्प विमानतळावरून हॉटेलच्या दिशेने रवाना झाले असा दावा रशिया टुडेने केला.

सिंगापूर -  उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाेंग उन रविवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत १२ जून रोजी होणाऱ्या शिखर परिषदेच्या २ दिवस आधीच येथे दाखल झाले. किम एअर चायनाच्या विमानाने सिंगापूरला आले. हा त्यांचा तिसरा विदेश दौरा आहे. याआधी त्यांनी दोन वेळा चीनचा दौरा केला आहे. किम व ट्रम्प यांची भेट कपॅला हॉटेलमध्ये होईल. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कॅनडातील क्युबेकमध्ये होत असलेली जी-७ परिषद सोडून सिंगापूरसाठी रवाना झाले. आपण शांततेच्या मिशनवर निघालो असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.  


त्याआधी चांगी विमानतळावर किम यांचे स्वागत सिंगापूरच्या विदेशमंत्र्यांनी केले. किम लिमोझिन कारने सेंट रेगिस हॉटेलकडे  गेले. त्यांच्यासोबत २० मर्सिडीझ कारचा सुरक्षा ताफा होता.

 

बातम्या आणखी आहेत...