आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण अण्वस्त्र निःशस्त्रीकरणासाठी किम तयार; आता व्हाइट हाऊसमध्ये बोलावणार ट्रम्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन यांनी संपूर्ण अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला असे माध्यमांनी सांगितले आहे. या दोघांनी चर्चा केल्यानंतर एका मेमोरेंडमवर सुद्धा स्वाक्षरी केली. त्यामध्ये अमेरिका आणि उत्तर कोरियात मैत्रीचा नवा अध्याय असा उल्लेख करण्यात आला आहे. 


संपूर्ण अण्वस्त्र निःशस्त्रीकरणासाठी तयार
- अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांमध्ये ऐतिहासिक भेटीत जो ठळक मुद्दा होता, त्यावर किम जोंग उन यांनी कटिबद्धता दर्शवली आहे. वॉलस्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, संपूर्ण अण्वस्त्र निःशस्त्रीकरणासाठी उत्तर कोरिया तयार आहे असे किम जोंग उन यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना सांगितले आहे.
- या दोघांनी चर्चा केल्यानंतर एका संयुक्त करारावर स्वाक्षऱ्या देखील केल्या. त्यामध्ये दोन्ही देशांनी अमेरिका आणि उत्तर कोरियात मैत्रीच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली असा उल्लेख केला आहे. 
- मात्र, स्वाक्षरी झालेल्या कागदपत्रांवर उत्तर कोरिया अण्वस्त्र पूर्णपणे त्यागणार असा उल्लेख करण्यात आलेला नाही. किम यांनी हा मुद्दा ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना मांडला आणि आपली कटीबद्धता दर्शवली आहे. भेटीनंतर ट्रम्प यांनीही चर्चा यशस्वी ठरली. कुणीही अपेक्षा करेल त्याहून ही चर्चा यशस्वी ठरली असे ट्रम्प म्हणाले. 
- सोबतच यापूर्वी चर्चेची ही अंतिम संधी असल्याचे बोलणारे ट्रम्प आता बदललेले दिसून आले. किम जोंग उन यांच्याशी पुन्हा भेट होईल. त्यांना आपण व्हाइट हाऊसमध्ये भेटीसाठी बोलावणार असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...