आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kim अन् Trump भेटले! अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी शेअर केला फोटो; हे होते कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर किमची भेट घेतली आहे. पण, ती व्यक्ती किम जोंग उन नव्हे, तर रियालिटी टीव्ही स्टार किम करदाशियन होती. उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन यांची भेट घेण्यापूर्वी त्यांनी या किमच्या भेटीला प्राधान्य दिले. सोबतच आपल्या ट्विटर अकाउंटवर तिच्यासोबतचा एक फोटो देखील पोस्ट केला. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प अतिशय खुश दिसून आले. त्यांनी फोटोला कॅप्शन देताना ग्रेट भेट असे लिहिले. 


हे होते भेटीचे कारण...
> अमेरिकेतील रियालिटी टीव्ही स्टार किम करदाशियनने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. किम करदाशियनने तुरुंग आणि कैद्यांच्या नियमांमध्ये बदलांच्या प्रस्तावासह राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली असे जाहीर करण्यात आले आहे. 
> सोशल मीडियावर स्क्रोल करताना किम करदाशियनने एक व्हिडिओ पाहिला होता. त्यामध्ये अॅलीस मारी जॉनसन हिची स्टोरी होती. 63 वर्षीय अॅलीस अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अमेरिकेत अमली पदार्थांच्या खरेदी विक्री करण्यास परवानगी मिळाल्यापूर्वी तिला अटक करण्यात आली होती. 30 मे रोजी अॅलीसचा वाढदिवस होता.
> तिचे वय आणि गुन्हा पाहता तिची शिक्षा माफ करण्यात यावी. तसेच तिच्यासारख्या इतर कैद्यांना सुद्धा सुटण्यासाठी तुरुंग नियमांमध्ये बदल करण्यात यावे अशी मागणी किमने ट्रम्प यांच्याकडे केली. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी किमसोबतचा एक फोटो ट्वीट केले. त्यामध्ये ट्रम्प यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येतो. 


कोण आहे किम करदाशियन?
रियालिटी टीव्ही स्टार होण्यापूर्वी किम करदाशियन आपल्या सेक्स सीडीमुळे चर्चेत आली होती. आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत तिने ती सीडी रिलीझ केली होती. यानंतर Keeping Up With The Kardashian नावाचा शो सुरू केला. यामध्ये ती आपली आई आणि इतर चार बहिणींसोबत दिसते. त्यांच्या घरात आणि आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक हालचाल आणि घटनेचे या रियालिटी टीव्हीशोमध्ये प्रसारण केले जाते. तिचे वडील अमेरिकेत खासदार होते. त्यांच्या निधनानंतर आईने दुसरा विवाह केला. त्या सावत्र वडिलांनी आपले सेक्स चेंज केले आहे. आता ती आपल्या वडिलांनाही आई म्हणते. किम आणि तिचे अख्खे कुटुंब अमेरिकेतील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, किमचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...