आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उ. कोरियाने अणुचाचणी केंद्र नष्ट केले, 8 तासांनी ट्रम्प यांनी बैठक केली रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्योंगयांग - उत्तर कोरियाने आश्वासनाप्रमाणे पुंग्ये-रीचे अणुचाचणी केंद्र नष्ट केले. विदेशी पत्रकारांच्या उपस्थितीत स्फोट करून चाचणी केंद्र नष्ट करण्यात आले. पण त्यानंतर ८ तासांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मूड उत्तर कोरियाच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे बिघडला. त्यामुळे त्यांनी १२ जूनची उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांच्यासोबतची   प्रस्तावित बैठक रद्द केली.

 

ट्रम्प यांनी पत्रात लिहिले-‘मी तुमच्या भेटीची प्रतीक्षा करत होतो, पण तुमच्या अलीकडच्या वक्तव्यात जाहीर झालेली गंभीर नाराजी आणि शत्रुत्व पाहता सध्या अशी भेट योग्य नाही, असे मला वाटते.तुम्ही तुमच्या अणुक्षमतेची गोष्ट करता, पण आमची क्षमता एवढी जास्त आहे की, मला कधी तिचा वापर करण्याची संधी मिळू नये अशी प्रार्थना मी ईश्वराकडे करतो.  

 

उत्तर कोरियन अधिकाऱ्यांना मिळाली होती सिंगापूरची मंजुरी  

तत्पूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद समिती ट्रम्प-किम यांच्या शिखर चर्चेसाठी सिंगापूरला जाणाऱ्या उ. कोरियन अधिकाऱ्यांच्या प्रवासावरील बंदी हटवण्यास तयार झाली होती. सिंगापूरने चर्चेच्या तयारीसाठी उत्तर कोरियाच्या प्रतिनिधी मंडळाला सूट देण्याची विनंती समितीकडे केली होती.    

 

उपाध्यक्ष पेन्स यांना मूर्ख म्हटल्यामुळे ट्रम्प झाले नाराज  

ट्रम्प यांचा मूड कोरियाच्या परराष्ट्र उपमंत्री चोन सन हुई यांच्या वक्तव्यामुळे खराब झाला. त्यात हुई यांनी म्हटले होते की, अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांचे ट्रम्प-किम यांच्या प्रस्तावित भेटीबाबतचे वक्तव्य अज्ञानतापूर्ण आणि मूर्खपणाचे आहे. त्यामुळे ट्रम्प भडकले. 

 

अमेरिका, चीन उ. कोरियावर दबाव कायम ठेवण्यावर सहमत  

तत्पूर्वी, सिंगापूरमध्ये ट्रम्प आणि किम यांच्या भेटीआधी अमेरिका आणि चीनने उ. कोरियावर नि:शस्त्रीकरणासाठी दबाव ठेवण्यावर सहमती दर्शवली होती. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो आणि त्यांचे चिनी समकक्ष वांग यी यांनी उ. कोरियाच्या मुद्द्यावर चर्चाही केली होती.  

 

अशी वाढवली अणू ताकद  

 

अणुचाचणी क्षमता भूकंप
सप्टेंबर २०१७       १६०  ६.३
सप्टेंबर -२०१६ १० ५.३   
जानेवारी- २०१६ ५.१    
फेब्रुवारी- २०१३ ७   ५.१   
मे- २००९ २      ४.७

क्षमता किलो टनमध्ये, भूकंप क्षमता रिश्टरमध्ये    

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...