आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील या तरुणीला मिळत आहेत लग्नाचे शेकडो प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात राहणारी लॉरेन आपल्या विनोदी स्वभावामुळे सोशल मीडियावर व्हायरल ठरत आहे. 20 वर्षीय लॉरेनला सोशल मीडियावर थेट लग्नाचे शेकडो प्रस्ताव येत आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला हजारो लाइक आहेत. गतवर्षी एका मोपेड अपघातात तिने आपला एक हात गमावला. शरीराचा एक अवयव नसतानाही इतकी कॉन्फिडेंट आणि उत्साही असलेली लॉरेन लोकांना खूप आवडत आहे. ती नेहमीच आपल्या फोटोंसह गमतीशीर किस्से सांगत राहते. 

 

बीचवरचा किस्सा
नुकतीच ती सागरी किनाऱ्यावर स्विमिंग करून बाहेर आली. तेव्हा एक लहान मुलगा तिला एकच हात असल्याचे पाहून दचकला. स्विमिंगसाठी जात असताना त्याने लॉरेनला विचारले, की तुझ्या हाताला काय झाले. तिने सांगितले, समुद्रात एक शार्क होती. तिने एक हातच खाऊन टाकले. तो मुलगा असा पळाला की परतलाच नाही.

 

इमोजींची गंमत
सोशल मीडियावर ती सांगते की क्लॅप अर्थात टाळ्या वाजवणारे इमोजी ती चॅटिंगमध्ये कधीच वापरत नाही. कारण, मला एकच हात असल्याने मी कधीच टाळ्या वाजवत नाही. ती सिंगल असून डेटिंग साइट्सवर आपल्या जोडीदाराचा शोध घेत आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लॉरेनचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...