आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासतील सर्वात कुख्यात ड्रग माफिया, दरवर्षी उंदिरच खायचे शेकडो कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए जगातील सर्वात कुख्यात ड्रग माफिया पाब्लो एस्कोबारचा छुपा खजिना शोधणार आहे. सीआयएच्या अधिकाऱ्यांनी ते ठिकाण सुद्धा शोधून काढले आहे, ज्या ठिकाणी अब्जावधींच्या खजिन्यासह त्याची पाणबुडी बुडाली होती. दोन दशकांपूर्वी जगभरात अमली पदार्थांच्या काळ्या बाजारात फक्त पाब्लो एमिलिओ एस्कोबार गॅव्हिरिया हे एकच नाव होते. तो जगातील सर्वात कुख्यात आणि धनाढ्य ड्रग लॉर्ड होता. त्याला एका एनकाउंटरमध्ये ठार मारण्यात आले होते. त्याच्याकडे इतका पैसा होता, की दरवर्षी उंदिर त्याच्या अब्जावधींच्या नोटा खात होते. 

 

दिवसाला 15 टन कोकेनची तस्करी
- पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅव्हिरिया एक कोलंबियन ड्रग माफिया होता. कोकेनचा त्याचा काळा बाजार जगभर पसरला होता. 
- पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबारचे पुस्तक 'द अकाउंट्स स्टोरी' नुसार, तो कित्येकवेळा एकाच दिवसात 15 टन कोकेनची तस्करी करायचा.
- 1989 मध्ये फोर्ब्स मॅगझीनने त्याला जगातील 7 वा सर्वात धनाढ्य संबोधले होते. त्याच्याकडे त्यावेळी 30 अब्ज अमेरिकन डॉलरची संपत्ती होती. 
- पाब्लोचा भाऊ रॉबर्टोने सांगितल्याप्रमाणे, त्याची वार्षिक कमाई 1,26,988 कोटी रुपये होती. त्याचा 10 टक्के भाग तर उंदिर खाऊन टाकायचे. किंवा पाणी लागून किंवा इतर कारणांमुळे वाया जायचे.
- फक्त नोटांचे बंडल बांधण्यासाठी तो महिन्याला पावणे दोन लाख रुपयांचे रबर बॅन्डवर खर्च करायचा. त्याने कोलंबियाच्या राजकारणात उतरण्याचा प्रयत्नही केला. त्यासाठी त्याला 10 अब्ज अमेरिकन डॉलर देशाच्या तिजोरीत जमा करण्याची ऑफर देण्यात आली. 
- पाब्लो कोलंबियन सरकार आणि अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू राहिला तरीही तो गरिबांसाठी देवदूत होता. नेहमीच रोमन कॅथोलिक समाज आणि गरिबांच्या मदतीसाठी तो काहीही करण्यास तयार होता. त्याला गरिबांचा रॉबिनहुड असेही म्हटले जायचे.
- त्याने 1976 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी 15 वर्षीय मारिया व्हिक्टोरियाशी विवाह केला होता. या दोघांना जुआन आणि मॅनुएला पाब्लो अशी मुले मुली आहेत. 
- एनकाउंटरनंतर सरकारने त्याची संपत्ती सील केली. तसेच अमेरिका त्याचा छुपा खजिना सुद्धा शोधून जप्त करणार आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पाब्लो एस्कोबार आणि त्याच्या खासगी आयुष्याचे PHOTOS

बातम्या आणखी आहेत...