आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतका अत्याचार की बंद झाले पीरियड्स, कोरियातील महिला सैनिकांची LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - उत्तर कोरियाच्या प्रसिद्धीसाठी जारी केल्या जाणाऱ्या अनेक फोटोजमध्ये स्कर्ट घातलेल्या महिला सैनिक आणि पोलिसांना दाखवले जाते. या महिलांच्या लष्करातील आयुष्याबद्दल एका माजी महिला सैनिकाने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, या महिला सैनिकांकडून इतके अवघड सैन्य सराव करून घेतले जातत की अक्षरशः अनेकींची मासिक पाळी बंद झाली. हे खुलासे करणारी महिला उत्तर कोरियाच्या लष्करात 10 वर्षे होती. महिलांसाठी लष्करात सेवा देणे म्हणजे, अमानवीय यातना असल्याचे ती सांगते. उत्तर कोरियाच्या महिला सैनिकांवर वरिष्ठांकडून बलात्कार केले जातात. त्यांच्यासाठी लैंगिक अत्याचार रोजचे बनले आहे. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी कुणीच नव्हते.


> ली सो येआन सध्या दक्षिण कोरियात राहते. मात्र, उत्तर कोरियाचे नाव काढताच तिच्या अंगावर काटे येतात. तिने भोगलेल्या मरण यातना पुन्हा तिच्या डोळ्यासमोर उभ्या होतात. 
> ली हिने नुकतेच ब्रिटिश माध्यम बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपबीती मांडली आहे. तिने उत्तर कोरियाच्या लष्करात 10 वर्षे काढले आहेत. ही 10 वर्षे तिला आपल्या इतर 24 महिला सहकाऱ्यांसोबत एकाच खोलीत चटईवर काढाव्या लागल्या. महिला सैनिकांना उत्तर कोरियात जनावरांसारखे ठेवले जात होते.
> खोलीच्या नावावर छोटेसे खुराडे होते. त्यामध्ये एक दोन चटाया सोडल्या तर काहीच नव्हते. त्या चटाया वर्षानुवर्षे बदलल्या जात नव्हत्या. त्यामध्ये महिला सहकाऱ्यांच्या घामाचा वास वसला होता. त्यामुळे अख्ख्या खोलीत घामाचा दुर्गंध पसरलेला असायचा. 
> महिलांना लष्करात आंघोळ करण्याची काहीही व्यवस्था नव्हती. त्यांना अतिशय थंड ठिकाणी पोस्टिंग दिली जात होती. आंघोळ करण्याची इच्छा झाल्यास गरम पाण्याची व्यवस्थाच नव्हती. 
> वॉटरफॉलला एखादी पाइपलाइन जोडून पाणी कॅम्पपर्यंत आणत होते. मात्र, अनेकवेळा त्या पाइपमध्ये साप, सरडे आणि कीडे येत होते. महिला सैनिकांसाठी शौचालय सुद्धा नव्हते. त्यांना उघड्यावर जाऊन शौच करावे लागत होते. 
> महिलांनाही पुरुषांइतकीच कठोर ट्रेनिंग दिली जात होती. काहींना तर या ट्रेनिंगचा इतका त्रास झाला की त्यांचे पीरियड्स बंद झाले. ज्या महिलांचे पीरियड्स सुरू होते, त्यांना लष्करात सॅनिटरी पॅड सुद्धा उपलब्ध करून दिले जात नव्हते. कपड्यांच्या तुकड्यांचा पुन्हा-पुन्हा धुवून त्या वापर करायच्या...

 

पर्याय नव्हता...
> ली चे वडील एका विद्यापीठात प्राध्यापक होते. तर कुटुंबातील इतर अनेक जण लष्करात होते. 1990 मध्ये उत्तर कोरियात भयान दुष्काळ पडला होता. लोक भुकेने मरत होते. त्यामुळेच, हजारो महिलांसह लष्करात सामिल होण्याशिवाय दुसरा पर्याय तिच्याकडे नव्हता. 
> देशात नोकरीच्या संधीच नव्हत्या. लष्करात मात्र, सरकार जास्तीत जास्त भरती करत होते. आपल्यालाही लष्करात सामिल होऊन किमान चांगले जेवायला तरी मिळेल अशी अपेक्षा तिने केली होती. मात्र, सुविधा दूरच राहिल्या. ली आणि तिच्या मैत्रिणींवर वरिष्ठ सैनिकांनी अत्याचार सुरू केले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या महिला सैनिकांची लाइफ...

बातम्या आणखी आहेत...