आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी सेक्स करताना करायचा हल्ला, तर कुणी 49 महिलांना मारून विकले मांस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - आपल्या पत्नीसह सर्वच मुलांची हत्या करणारा ब्रिटिश सीरियल किलर डॅमेनचा यॉर्कशायर येथील तुरुंगात मृत्यू झाला. त्याला आपल्या 2 वर्षीय चिमुकल्यावर सुद्धा दया आली नव्हती. त्याला सुद्धा या नराधमाने अतिशय क्रूरपणे मारले होते. सीरियल किलर क्रूरकर्मांच्या यादीत तो एकटा नाही. यात एक खुनी असाही आहे, ज्याने 10 वर्षांत 49 महिलांना ठार मारले होते. यासोबतच इतर सीरियल किलर्सबद्दलही आम्ही माहिती देत आहोत. 

 

ग्रे लियोन रिग्वे
49 मर्डर
वॉशिंगटन, अमेरिका

 

- ट्रक पेंटर राहिलेला ग्रे लियोन रिग्वे जगासमोर ग्रीन रिव्हर सीरियल किलर म्हणून समोर आला होता. 10 वर्षांत त्याने 49 महिलांची कत्तल केली होती. 
- वॉशिंगटन स्टेटच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ग्रेने एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यापेक्षा अधिक महिलांना ठार मारल्याचा दावा केला होता. मोबाईलवर झालेल्या या मुलाखतीमध्ये त्याने 80 महिलांचा खून केल्याचा दावा केला. 
- 2001 मध्ये त्याने आपला गुन्हा कबूल केला. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना तो आपल्या घरी आणायचा आणि सेक्स करतानाच त्यांच्यावर अचानक हल्ला करायचा. 
- त्याची क्रूरता येथेच संपत नाही. त्याने मारलेल्या महिलांपैकी अनेकींना नदीत फेकले. तर काहींचे तुकडे करून त्याने पोलिसांना जनावरांचे मांस म्हणून विकले होते. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर क्रूरकर्मा सीरियल किलर्सबद्दल...

बातम्या आणखी आहेत...