आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामायण काळाशी आहे श्रीलंकेतील या जागेचे कनेक्शन, जगभरातून येतात लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात आजही अशी ठिकाणे आहेत ज्यांचे रहस्य अद्याप सुटलेले नाही. त्यापैकीच एक रहस्य श्रीलंकेतील 'अॅडम्स पीक' या डोंगरात दडले आहे. श्रीपदा या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी हिंदू धर्माच्या आख्यायिकेनुसार, महादेव भगवान शिवशंकराच्या पाऊलखुणा आहेत. सोबतच या डोंगराचा संबंध थेट रामायण काळाशी देखील आहे. 

 

- रतनपूर जिल्ह्यात असलेले हे डोंगर घनदाट जंगलात आहे. या ठिकाणाला मोल्यवान खड्यांसाठी सुद्धा ओळखले जाते. 
- जवळपास 2200 मीटर उंचीवर असलेले हे डोंगर समनाला माउंटेन रेंजचा भाग आहे. श्रीलंकेतील स्थानिक यास रहुमाशाला कांडा असेही म्हणतात. याच डोंगरावर एक मंदिर आहे.
- आख्यायिकेनुसार, राम आणि रावणात युद्धाच्या वेळी लक्ष्मण मेघनादच्या बाणाने जखमी झाले होते. त्यांचा जीव फक्त संजीवणी बूटीनेच वाचवले जाणे शक्य होते. ते आणण्याचे कार्य राम भक्त हनुमानला सोपविण्यात आले होते. 
- हनुमान हिमालयाच्या कुशीत संजीवनी बूटी शोधत होते. परंतु, त्यांना ती बूटी नेमकी कोणती हे कळत नव्हते. तेव्हा त्यांनी त्या डोंगराचा चक्क एक तुकडाच घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. डोंगराचा तो तुकडाच आज श्रीलंकेत श्रीपदा या नावाने ओळखला जातो अशी मान्यता आहे. 

भगवान महादेवाच्या पायाच्या खुणा
- या डोंगरावर असलेले मंदिर पायांच्या खुणांमुळे प्रसिद्ध आहे. हिंदू धर्माच्या आख्यायिकेनुसार, पायाच्या या खुणा भगवान शिवशंकराच्या आहेत. 
- भगवान शिव मानवजातीला आपले दिव्य प्रकाश देण्यासाठी याच ठिकाणी प्रकट झाले होते. त्यामुळे, यास सिवानोलीपदम (शिवचा प्रकाश) असेही म्हटले जाते. 

 

या धर्मांचेही दावे...
- जगातील 4 सर्वात मोठे धर्म समुदाय या डोंगर आणि ठिकाणासाठी आप-आपले दावे करतात. 
- बौद्ध, हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मीय या ठिकाणाला भगवान गौतम बुद्ध, भगवान शिव, आदम (अॅडम) आणि सेंट थॉमसशी जोडून पाहतात. 
- आशिया खंडातील सर्वात देखणा सूर्योदय याच ठिकाणातून होतो. तो पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. 

 

(नोट- 6 मार्चपासून श्रीलंकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशमध्ये तिहेरी टी-20 मालिका सुरू आहे. त्या निमित्त आम्ही श्रीलंकेतील विविध पैलूंवर प्रकाश टाकत आहोत.)

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या ठिकाणाचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...