आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायिका रिहानाच्या नाराजीमुळे स्नॅपचॅटच्या नेटवर्थमध्ये 975 कोटींची घट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- पॉप गायिका रिहाना नाराज झाल्यामुळे मल्टिमीडिया मेसेजिंग अॅप कंपनी स्नॅपचॅटला मोठे नुकसान सहन करावे लागले. स्नॅपचॅटवर कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांबाबत सुरू असलेल्या जाहिरातीवर रिहानाने केवळ नाराजीच व्यक्त केली नाही, तर याबाबतचा राग तिने सार्वजनिक स्वरूपात व्यक्त केला. त्यानंतर दोन दिवसांतच कंपनीच्या नेटवर्थमध्ये ९७५ कोटी रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.  


रिहानाला स्नॅपचॅटच्या एका अॅप बेस्ड गेमवर राग होता. ‘वुड यू रादर’ गेममध्ये युजरला मत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यात विचारण्यात आले होते की, तुम्ही रिहानाला थोबाडीत मारू इच्छिता की रिहानाचा माजी मित्र क्रिस ब्राऊन याला गुद्दा घालण्याची इच्छा आहे. या गेमला तुमच्या फोन आणि इतर ठिकाणांवरून त्वरित डिलीट करण्याची विनंती रिहानाने सोशल मीडियावर केली होती. तिने केवळ गेम डिलीट करण्याचे सांगितले आणि दुसरीकडे स्नॅपचॅटला व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागले. एका अहवालानुसार यामुळे कंपनीला जवळपास ४.७ टक्के नुकसान सहन करावे लागले.

 

या जाहिरातीमुळे मला २००९ च्या त्या घटनेची पुन्हा आठवण करून दिली असल्याचे रिहानाने सांगितले आहे. त्या वेळी गायक आणि रिहानाचा मित्र क्रिस ब्राउनने तिच्यावर हात उचलला होता. या कौटुंबिक हिंसाचारामुळे रिहानाला हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते.  या प्रकरणात क्रिसने न्यायालयात गुन्हा मान्य केला होता. या घटनेनंतर स्नॅपचॅटने ही जाहिरात डिलीट केली असून याप्रकरणी माफी मागितली आहे. मात्र, रिहानाने त्यांची माफी मान्य केली नाही.

बातम्या आणखी आहेत...