आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: घरात रोपटे लावत होते पती-पत्नी; अचानक सापडले खजिन्याचे बॉक्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - येथील स्टेलन बेटावर राहणाऱ्या मॅथ्यू आणि मारिया यांच्या जोडप्याला आपल्या घरात एक तिजोरी सापडली. ते आपल्या घरातील बगीचात रोपटे लावत होते. त्याचवेळी त्यांना लोखंडी बॉक्स सापडले. हे बॉक्स प्रत्यक्षात एक तिजोरी होती, जी सोने, चांदी आणि हिऱ्यांनी भरलेली होती. सोबतच त्यामध्ये अनेक पाउच सापडले. त्या पाउचमध्ये सुद्धा मोल्यवान अंगठ्या आणि चेन सापडल्या आहेत. 


या पत्त्यावर पोहोचले कपल...
> मोल्यवान धातू आणि हिऱ्यांनी भरलेल्या बॅगा पाहून मॅथ्यू आणि त्याच्या पत्नीला कळाले की ह्या वस्तू चोरीच्या होत्या. तसेच चोरट्यांनी हा खजिना येथे लपविला होता. याच बॉक्समध्ये एक पत्ता सुद्धा सापडला. हा पत्ता काही दूरचा नसून जवळच्याच एका घराचा होता. मॅथ्यू हा बॉक्स घेऊन त्याच पत्त्यावर पोहोचले. तसेच पोलिसांना सुद्धा माहिती दिली. 
> मॅथ्यूने सांगितल्याप्रमाणे, मी जेव्हा शेजारी जाऊन विचारलो की तुमच्या घरात चोरी झाली होती का? तेव्हा त्यांनी हैराण होऊन होय असे उत्तर दिले. यानंतर मी न्यूयॉर्क पोलिसांशी संवाद साधून याची शहनिशा तपासून घेतली. त्यांनीच मला 2011 मध्ये झालेल्या चोरीचे प्रकरण सांगितले. त्यावेळी 52 हजार अमेरिकन डॉलरची (35.21 लाख रुपये) चोरी नोंदवली होती. घराच्या गार्डनमध्ये तेवढ्याच किमतीचा खजिना सापडला आहे. 


...आणि परत केला खजिना
पोलिसांकडून मिळालेली माहिती लक्षात घेऊन मॅथ्यू आणि त्याच्या पत्नीने तो संपूर्ण खजिना स्वतः न ठेवता त्याच्या खऱ्या मालकाला परत केला. यावर अनेक जण हैराण झाले. तसेच खजिना परत का केला असे विचारले. त्यावर मारिया म्हणाल्या, तो खजिना आमचा नव्हताच. आम्हाला काही पुरस्कार किंवा लॉट्री सुद्धा लागलेली नव्हती. आम्ही जे काही केले ते आमचे चांगले कर्म आहेत. खजिन ज्या ठिकाणी सापडला. त्याची आठवण म्हणून त्यांनी तेथे एक मातीचा हत्ती ठेवला आहे. 


पुढील स्लाइड्सवर, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...