आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टर मुस्लिम राष्ट्र इराणचा दुसरा चेहरा, धनाढ्य तरुण-तरुणींची LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इराणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सरकार विरोधी निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांसाठी येथील धनधाकड्यांना जबाबदार धरले जात आहे. एकीकडे जगभरात कट्टर मुस्लिम देश आणि कठोर कायद्यांमुळे ओळखल्या जाणाऱ्या इराणचे ही धनाढ्य मंडळी दुसरेच चित्र दाखवते. सरकार गरिबांची मुस्कटदाबी करते, पण बिकिनी आणि शॉर्ट स्कर्ट्ससह नाइटक्लबमध्ये धिंगाणा घालणाऱ्या तरुणाईवर कोणतीही कारवाई करत नाही. येथील अब्जाधीशांची मुले-मुली आपल्या इंस्टाग्रामवर दररोज पार्ट्यांचे फोटोज पोस्ट करतात. त्यामुळे, देशातील निदर्शने आणखी तीव्र होत आहेत. 

 

- जर्नलिस्ट आमिर अहमदी यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखानुसार, 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर देशात अनेक बदल घडून आले. काहींना भ्रष्ट सरकारकडून फायदा झाला. तर काही घाबरून जगत आहेत. 
- अहमदींनी आर्टिकलमध्ये सांगितल्याप्रमाणे, इराणचा धनाढ्य युवा वर्ग एखाद्या राजेशाही कुटुंबाप्रमाणे वागत आहे. एकीकडे देशात लोक भुकेने मरत असताना ही तरुण पिढी इंस्टाग्रामवर पॉर्श आणि महागड्टा बंगल्यांसह पैश्यांचे प्रदर्शन करत आहे. 
- इराणमध्ये सरकार काही लोकांना फक्त हिजाब घातला नाही म्हणून अटक करते. पण, देश-परदेशात बीचवर आणि नाइटक्लब्समध्ये बिकिनीजमध्ये पार्ट्या करणाऱ्यांवर काहीच बोलत नाही. 
- त्यांनी रिच किड्स ऑफ तेहरान या इंस्टाग्राम पेजला उदाहरण म्हणून प्रस्तुत केले आहे. अशा तरुण-तरुणींना इराणचे कोणतेही कायदे लागू होत नाही का, असा जाब त्यांनी विचारला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या फोटोजमुळे वाढतेय सरकारविरोधी द्वेष...

बातम्या आणखी आहेत...