आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवने नाकारला भारतासोबत संयुक्त युद्ध सरावाचा प्रस्ताव, कारणही दिले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालदीवमध्ये आणीबाणीची तारीख वाढवण्यात आली तेव्हा भारताने त्यावर आक्षेप घेतला होता. - Divya Marathi
मालदीवमध्ये आणीबाणीची तारीख वाढवण्यात आली तेव्हा भारताने त्यावर आक्षेप घेतला होता.

नवी दिल्ली - मालदीवने भारताकडून मिळालेला संयुक्त युद्ध सराव 'मिलन' नाकारला आहे. भारतीय नौदलाने हा प्रस्ताव पाठवला होता. त्यास नकार देताना मालदीवच्या कोस्ट गार्डने कारण सुद्धा दिले नाही. भारतीय नौदलाकडून मिलन युद्ध सराव पोर्टब्लेयर येथे 6 ते 13 मार्च पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. यात भारतासह एकूण 17 देशांचे नौदल सहभागी होत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, मालदीवमध्ये सध्या सत्तासंकट असून 5 फेब्रुवारीपासून आणीबाणी लागू आहे. 

 

काय म्हणाले नौदल प्रमुख?
- भारतीय नौदलाचे चीफ अॅडमिरल सुनील लांबा यांनी सांगितले, "आम्ही मालदीवला मिलन सरावात सहभागी होण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, मालदीवने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यासंदर्भात अद्याप कारण देण्यात आलेले नाही. आतापर्यंत या सरावात 16 देशांनी सहभागी होण्यास होकार दिला आहे.''
- अॅडमिरल लांबा पुढे म्हणाले, "हिंद महासागरात चीनच्या वाढत्या हालचालींवर भारताची करडी नजर आहे. भारतीय लष्कराच्या 8 ते 10 युद्धनौका हिंद महासागरात नेहमीच तैनात असतात."
- उल्लेखनीय बाब म्हणजे, मालदीवमध्ये आणीबाणीची तारीख वाढवण्यात आली तेव्हा भारताने त्यावर आक्षेप घेतला होता. तसेच ही आणीबाणी घटनेच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. त्यावर मालदीवने नाराजी व्यक्त केली होती. 
- मालदीवमध्ये सुरू असलेले सत्ता संकट आणि भारताच्या त्यावर असलेल्या प्रतिक्रिया पाहता मालदीवने या सरावात सहभागी होण्यास नकार दिला असे म्हटले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...