आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप मारून मुंडके छाटले, त्याच शिराने घेतला चावा; झाले असे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात सर्पदंशाचा एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे एका युवकाला त्याच्यात घरातील गार्डनमध्ये एक मुंडके तुटलेल्या सापाने चावा घेतला. हा सर्प इतका विषारी होता की चावल्यानंतर हळू-हळू त्या युवकाची दृष्टी गेली. तसेच संपूर्ण शरीरात इंटर्नल ब्लीडिंग सुरू झाली. परिस्थिती इतकी बिघडली की त्याला तातडीने एअर अॅम्बुलन्स बोलावून रुग्णालयात पाठवण्यात आले.


असे आहे प्रकरण...
> ही घटना लेक कॉर्प्स क्रिस्टी परिसरात राहणाऱ्या मायलो आणि जेनिफर सॅटक्लिफ यांच्या घरात घडली आहे. 27 मे रोजी मायलो याला आपल्या अंगणात काम करताना अचानक एक साप दिसून आले. त्याने 4 फुट लांब अशा रॅटल स्नेकला आपल्या हातात असलेल्या गार्डनिंग टुलने मारून टाकले. तसेच त्याचे शिर धडापासून वेगळे करून सोडून दिले. 
> जेनिफरने सांगितल्याप्रमाणे, शिर कापल्यानंतर साप मेला असेल असा भास त्या दोघांनाही झाला. पण, कापलेल्या शिरमध्ये अजुनही जीव होता. तरीही मायलो त्या सापाजवळ गेला आणि त्याचे शिर व धड तेथून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करायला लागला. याचवेळी त्या कापलेल्या शिरने मायलोचा चावा घेतला.
> Snake Bite होताच त्याची अवस्था बिघडायला सुरुवात झाली. हळू-हळू त्याची दृष्टी गेली आणि अख्खे शरीर लाल-निळे पडले होते. तो चक्क येऊन पडला. तेव्हा जेनिफरने आपातकालीन नंबर डायल केला. तसेच आपल्या कारने त्याला हॉस्पिटलच्या दिशेने घेऊन निघाली. परंतु, वाटेत परिस्थिती आणखी बिघडल्याने त्याला हेलिकॉप्टरने रुग्णालयात पोहोचवावे लागले. 
> हे सर्पदंशाचे सामान्य प्रकरण नव्हते. डॉक्टरांना त्याचा जीव वाचवण्यासाठी अॅन्टीव्हेनमच्या 26 डोस द्याव्या लागल्या आहेत. सामान्य सर्पदंशावर या औषधीचे 2 किंवा 4 डोस दिले जातात. उपचारानंतर तो धोक्यातून बाहेर आला. परंतु, त्याची किडनी अजुनही नाजूक अवस्थेत आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या सापाचे आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...