आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य माणसाने हॉटेलात केला पंतप्रधान असल्याचा ढोंग, मिळाली VIP मेजवानी, ऑटोग्राफही दिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - एका सामान्य माणसाने रेस्टॉरंटमध्ये सहज टेबल बुक करण्यासाठी चक्क आपण मोरॉक्कोचे पंतप्रधान बोलत आहोत असा दावा केला. रेस्टॉरंटच्या मालक आणि कर्मचाऱ्यांना या देशाचा पंतप्रधान सुद्धा माहिती नव्हता. त्यांनी त्या माणसाचा दावा खराच मानला. तसेच हॉटेलात बोलावून चक्क व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. सगळेच कर्मचारी आपल्या कथित पंतप्रधानाच्या सेवेत मशगूल झाले. त्या सर्वांनीच त्या माणसासोबत एक फोटो काढण्यासाठी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी सुद्धा केली. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या वडिलांची ही गंमत सोशल मीडियावर शेअर केली. ट्वीटवरून हे प्रकरण रशियातील असल्याचे समजते.


ट्वीटमध्ये काय लिहिले?
- मुलाने 3 दिवसांपूर्वी @Ihab8knicks नावाच्या अकाउंटवर ट्वीट करत आपल्या वडिलांचा किस्सा शेअर केला. तोच किस्सा आता सर्वत्र व्हायरल होत आहे. तो म्हणतो, ''माझे वडील एका रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करण्याचा प्रयत्न करत होते. पण, रेस्टॉरंटने स्पष्ट नकार दिला. काही मिनीटांतच त्यांनी आपण मोरॉक्कोचे पंतप्रधान बोलत आहोत असे म्हणत फोन लावला. तेव्हा रेस्टॉरंटने वेळीच टेबल ऑफर केले.

- अतिशय चांगली मेजवाणी देत मुख्य शेफ बाहेर आला आणि त्याने खाललेल्या ताटावर त्यांची स्वाक्षरी सुद्धा घेतली. सगळ्याच कर्मचाऱ्यांनी माझ्या वडिलांसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती." त्या मुलाने आपल्या वडिलांचा व्हिडिओ सुद्धा ट्वीट केला आहे. जो जवळपास 3 लाख लोकांनी पाहिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...