आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत चुकून झाली कैद्याची सुटका; पत्नीने 2 तासांत नेऊन सोडले तुरुंगात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील कोलोरॅडो प्रांतात प्रशासनाकडून चुकून एक कैदी जेम्स रेनर्सन (38) ची सुटका करण्यात आली. त्याने खुश होऊन थेट घर गाठले. परंतु, अवघ्या दोन तासांत जेम्सची पत्नी त्याला टॅक्सीने तुरुंगात घेऊन पोहोचली. जेम्स रेनर्सनवर धमकावणे आणि कायदा मोडल्या प्रकरणी खटला सुरू आहे. आता या प्रकरणानंतर जेम्स विरोधात तुरुंगातून पळून जाणे आणि फसवणूक असे आणखी दोन खटले दाखल करण्यात आले आहेत. 


माहिती अपडेट नाही केल्याने घोळ
द ग्रॅन्ड जंक्शन डेली सेंटीनलच्या एका वृत्तानुसार, कागदपत्रांमध्ये झालेल्या चुकीमुळे रेनर्सनची सुटका झाली होती. काही दिवसांपूर्वीच रेनर्सन असलेल्या तुरुंगाच्या खोलीत आणखी एक कैदी मार्विन मार्चला डांबण्यात आले. यानंतर मार्विनला रेनर्सनच्या सेलमधून दुसरीकडे हलवण्यात आले. परंतु, ही माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी डेटाबेसमध्ये अपडेट केली नाही. त्यामुळे, जेव्हा मार्विनच्या सुटकेची वेळ झाली, तेव्हा तुरुंगातील अधिकारी चक्क रेनर्सनला बाहेर घेऊन आले. विशेष म्हणजे, आपण ज्याची सुटका करतोय तो खरंच हाच कैदी आहे का? याची शहनिशा सुद्धा प्रशासनाने केली नाही. त्यामुळेच, जेम्स रेनर्सन सुटला. 

 

स्टाफने मान्य केली चूक
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, यात चूक तुरुंग प्रशासनाची आहे. मेसा काउंटी पोलिस अधिकारी हेनरी स्टोफेल म्हणाले, "जेल स्टाफने पूर्णपणे नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी रेनर्सनच्या हातावर बांधलेला बॅन्ड आणि त्यावरील फोटो सुद्धा पाहिला नाही." पोलिस अधिकाऱ्यांनी रेनर्सनच्या पत्नीच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. परंतु, तिने आपल्या पतीला तुरुंगात नेण्यासाठी तयार कसे केले हे अद्याप कळू शकले नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...