आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GF ने बरबाद केले या तरुणाचे आयुष्य; कोर्टाने दिली तब्बल 2.57 कोटींची नुकसान भरपाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉन्ट्रेयल - कॅनाडामध्ये राहणाऱ्या एरिक अब्रामोव्हित्स नावाच्या एका तरुणाने आपल्या माजी प्रेयसीवर करिअर उद्ध्वस्थ करण्याचा आरोप लावला. तसेच कोर्टाकडून नुकसान भरपाई मागितली. विशेष म्हणजे, कोर्टाने त्याचा दावा मान्य करत त्याच्या एक्स गर्लफ्रेंडवर 3.75 लाख अमेरिकन डॉलरचा (2.57 कोटी रुपये) दंड ठोठावला. तसेच ती रक्कम एरिकला देण्याचे आदेश दिले. एरिकची गर्लफ्रेंड खूप हट्टी होती. आपला प्रियकर कुठेही जाऊ नये अशी तिची इच्छा होती. 


अॅडमिशनचे ईमेलही केले डिलीट
> एक्स गर्लफ्रेंड जेनिफर ली आपला प्रियकर एरिक विषयी खूप भावनिक होती. तो कधीच दूर जाऊ नये असा तिचा हट्ट होता. एरिकला म्युझिक शिकण्याची आणि संगीतकार होण्याची आवड होती. त्याने एका प्रतिष्ठित म्युझिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता. 
> लॉस एंजेलिस येथील प्रसिद्ध स्कूल कॉलबर्न कंझर्वेटरी ऑफ म्यूझिक येथे त्याने प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. या स्कूलमध्ये एकमेव म्युझिक टीचर येहूदा गिलाड वर्षातून फक्त 2 विद्यार्थांना संगीत शिकवतात. 2013 मध्ये त्याने येथे प्रवेश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. स्कूलने एरिकचे लाइव्ह ऑडिशन देखील घेतले होते. 
> यानंतर त्यांनी एरिकचे प्रवेश स्वीकार करणारा ईमेल आला पाठवला होता. परंतु, तो एरिकने नाही तर जेनिफरने उघडला आणि पाहताक्षणी डिलीट केला. दुसरा ई-मेल आला तो प्रवेश नकारण्याचा होता. तो ईमेल मात्र जेनिफरने खुशाल एरिकला दाखवला. 
> इतक्या प्रतिष्ठित म्यूझिक स्कूलकडून नकार मिळाल्यानंतर त्याने दुसरीकडून म्युझिकचे प्रशिक्षण घेतले. परंतु, खरे काय ते एरिकला 2 वर्षांनंतर कळाले. जेनिफरच्या हट्टामुळे आपले म्युझिक करिअर बर्बाद झाल्याचे आरोप लावत एरिकने भरपाईची मागणी केली. 


प्रवेश नकारल्याचा ई-मेल तिचाच होता...
एरिकला आपल्या प्रवेशासंदर्भातील ईमेलचा साक्षात्कार दोन वर्षांनंतर झाला. दुसऱ्या म्युझिक स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतरही एरिकला राहावले नाही. तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर पुन्हा गिलाड यांची भेट घेण्यासाठी गेला. तसेच या भेटीत त्याने मला रिजेक्ट का केले होते? असा प्रश्न विचारला. सोबतच, रिजेक्ट केल्याचा ईमेल सुद्धा दाखवला. यावर गिलाड यांनाही धक्का बसला. हे ईमेल अकाउंट आपले नाही असा खुलासा त्यांनी केला. प्रत्यक्षात, नकारल्याचा ईमेल त्या स्कूलने नव्हे, तर स्वतः जेनिफरने बनावट ईमेल अकाउंटवरून पाठवला होता. हे दोघे एकाच शाळेत आणि महाविद्यालयात शिकत होते. यानंतर दोघांमध्ये अफेअर सुरू झाले. एरिकने आपल्याला सोडून कुठेही जाऊ नये यासाठी ती काहीही करायला तयार होती. एरिकला गिलाड यांनी शिकण्याची संधी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...