आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगाबाज गर्लफ्रेंडच्या बाजूला बसून घेतला असा Selfie, तिला माहितीच नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्युनस आयर्स - अर्जेंटीना येथे राहणाऱ्या 20 वर्षीय मारियानोची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्याने आपल्या दगाबाज गर्लफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडले आहे. तसेच तिचा दुसऱ्या एका तरुणाला किस करतानाचा सेल्फी फोटो क्लिक करून आणला. यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत तिची पोलखोल केली. मारियानोच्या पोस्टला आतापर्यंत 70 हजारांहून अधिक लाइक मिळाले आहेत. 

 

अपघाताने पकडली गेली...
- ती सुद्धा मारियानोला अपघातानेच सापडली. तिने मारियानोसोबत बाहेर जाण्यास नकार दिला. यानंतर मारियानो एकटाच जवळच्या एका पबमध्ये पार्टीसाठी गेला. त्या ठिकाणी आपल्या गर्लफ्रेंडला पाहून तो हैराण झाला.
- तो गर्लफ्रेंडच्या अगदी जवळ गेला. पण, ती दुसऱ्या तरुणाला किस करण्यात इतकी मशगूल होती की आसपासचे तिला काहीच दिसत नव्हते. 
- त्यानेही प्रेयसीला काहीच बोलले नाही. मारियानो त्या दोघांच्या जवळ गेला आणि त्यांच्याच सोफ्यावर बाजूला जाऊन बसला. तरीही त्यांना समजले नाही. 
- यानंतर मारियानो आपला मोबाईल फोन काढला आणि बाजूला बसलेला सीन बॅकग्राउंडमध्ये ठेवून एक सेल्फी क्लिक केला. तोच सेल्फी त्याने फेसबूकवर अपलोड केला आहे. 
- सेल्फी अपलोड करताना त्याने लिहिले, "माझ्या गर्लफ्रेंडला (आता एक्स) दुसऱ्यासोबत किस करताना रंगेहाथ पकडले. तिला माहितीच नाही की ती आणि मी एकाच पबला आलो."
- दुसऱ्या दिवशी गर्लफ्रेंडला जाग आली तेव्हा तिने फेसबूकवर आपल्या प्रियकराची पोस्ट वाचली. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडला एक मेसेज पाठवला. तो देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, पकडले गेल्यानंतर काय होती गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...