आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय मुजाहिद अर्शिद आणि त्याचा कर्मचारी विन्सेंट टप्पू या दोन जणींवर बलात्कार आणि हत्येचा खटला सुरू आहे. त्यापैकी एक पीडित सेलीन दुखरान (20) अर्शिदची सख्खी पुतणी होती. तिच्यावर नराधमांनी शॉक देत-देत बलात्कार केला. तसेच मन भरल्यानंतर गळा चिरून हत्या केली आणि मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. त्याचवेळी घरात दुखरानची मैत्रिण अंघोळ करत होती. नराधमांनी तिलाही सोडले नाही. मात्र, तिची मैत्रीण जिवंत वाचली आणि तिनेच पोलिसांना हा प्रकार सांगितला.
- ही घटना लंडन येथे जून महिन्यात घडली आहे. मात्र, पीडित पुत्नी दुखरानच्या मैत्रिणीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
- कित्येक महिन्यांपासून काका अर्शिदने आपली पुत्नी दुखरानवर वाइट नजर ठेवली होती. मात्र, आपली इच्छा काही पूर्ण होणार नाही याची त्याला जाणीव होती.
- त्याच दरम्यान दुखरानचा एक लीबियन बॉयफ्रेंड असल्याची माहिती अर्शिदला मिळाली. त्यावरून तो इतका चिडला की त्याने दुखरानला 'धडा' शिकवण्याचा निर्णय घेतला.
- घरी कुणी नसतानाचा गैरफायदा घेत तो आपला एक कर्मचारी टप्पू (28) सोबत तिच्याकडे गेला. त्याने आपल्यासोबत टेझर गन नेली होती.
- याच टेझर गनचा वापर करून अर्शिद आणि टप्पूने दुखरानवर आळी-पाळीने बलात्कार केला. त्याच घरामध्ये दुखरानची मैत्रिण अंघोळ करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
- अर्शिद आणि टप्पूने तिला देखील पकडून बेडरुममध्ये नेले आणि तिच्यावर सुद्धा अमानुष बलात्कार केला. हे कृत्य करताना ते टेझर गनचाही वापर करून तिला शॉक देत होते.
- यानंतर हे नराधाम दोघींना दुसऱ्या एका घरात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी सुद्धा दोघींवर कित्येक तास अत्याचार केले.
- त्याच घरात अर्शिद आणि त्याच्या सहकाऱ्याने दुखरानचा गळा चिरला. तसेच तिचा मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवला. तिच्या मैत्रीचा गळा सुद्धा चिरून मरण्यासाठी सोडून दिले. पण, ती वाचली आणि तिनेच पोलिसांना फोन करून सर्व प्रकार सांगितला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.