आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद सैनिकाचे स्मारक झाले हिरवेगार; कारण ऐकूण Emotional झाले आई-वडील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकन एअर फोर्सचा शहीद जवान जोसेफ विलासेनरची कब्र अचानक हिरवीगार पाहून त्याचे पालक हैराण झाले. विशेष म्हणजे, जोसेफच्या समाधीच्या सभोवताल इतर कब्री सुद्धा होत्या. परंतु, फक्त जोसेफच्या कब्रीवर हिरवेगार गवत उगवले होते. जोसेफचा मृत्यू 5 वर्षांपूर्वी झाला होता. त्याने 16 वर्षे हवाई दलात सेवा दिली होती. अशाच एका उन्हाळ्यात जेव्हा आई-वडील जोसेफच्या कब्रीवर गेले तेव्हा त्यांना ही हिरवळ दिसून आली. या मागचे कारण समोर आले तेव्हा पालक भावूक झाले. 


एक अनोळकी व्यक्ती घेत होती काळजी...
हैराण झालेल्या आई-वडिलांनी जवळच्या चर्चशी संवाद साधला आणि त्याविषयी विचारणा केली. तेव्हा त्यांचा मुलगा जोसेफच्या कब्रीची देखभाल एक व्यक्ती करत असल्याचे त्यांना कळाले. जेक नावाचा 86 वर्षीय वृद्ध रोज जोसेफच्या कब्रीवर पाणी टाकत होते. जेव्हा जोसेफच्या आई-वडिलांनी त्या वृद्धाची भेट घेतली तेव्हा त्याने या मागचे भावूक कारण सांगितले. 


काय म्हणाला जेक..?
- जेकने सांगितल्याप्रमाणे, 2014 मध्ये त्याच्या पत्नीचे निधन झाले होते. ती 65 वर्षांची होती. पत्नीच्या मृत्यूला 4 वर्षे झाली तरीही आपण न चुकता रोज तिच्या कब्रीवर गुलाब आणि पाणी घेऊन येतो. अशाच एका दिवशी त्यांना शेजारच्या कब्रीवर एक तरुणी रडताना दिसून आली. ती कब्र जोसेफची होती.
- जेकने तिच्याशी संवाद साधला परंतु, तिचे रडणे काही थांबतच नव्हते. कसेबसे तिला शांत केले आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला. तिने आपले नाव मीशा असे सांगितले. तसेच ती ज्या कब्रीवर रडत होती तो तिचा पती जोसेफ होता. जोसेफने 16 वर्षे देशाची सेवा केली आणि अचानक त्याचा मृत्यू झाला असेही तिने म्हटले. यानंतर मीशा तेथून निघून गेली. 
- तेव्हापासून जोसेफने आपल्या पत्नीसह जोसेफच्या कब्रीवर सुद्धा पाणी टाकण्यास सुरुवात केली. पालकांनी जेव्हा कारण विचारले तेव्हा जेकने उत्तर दिले, "जोसेफ 16 वर्षे आपल्या देशाची सेवा करत होता. त्याच्यासाठी इतके करणे भाग होते." हे ऐकूण जोसेफचे आई-वडील भावूक झाले. जेकच्या या अनोख्या श्रद्धांजलीने त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

 

बातम्या आणखी आहेत...