आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियातील एकमेव माणूस, कितीही नियम मोडले तरी शिक्षा होत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात एक्कलकोंडा राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर कोरियात कठोर नियम आणि कायदे आहेत. दुसऱ्या देशातून येणारे पत्रकार आणि पर्यटकांना सुद्धा या देशात परवानगीशिवाय फोटो सुद्धा काढता येत नाही. विमानातच पर्यटकांचे कॅमेरे जप्त केले जातात. प्रत्येक ठिकाणी गार्ड्सचा पहारा असतो. पर्यटकांनी कुठे जावे आणि कुठे जाऊ नये यासाठी सुद्धा वेगळे कर्मचारी ठेवले आहेत. कुठल्या कारणामुळे येथील सुप्रीम लीडर किम जोंग आणि सरकारच्या भावना दुखावल्या जातील हे काहीच सांगता येत नाही. त्यासाठी आपल्याला अटक केली जाऊ शकते तसेच हेरगिरीचा खटला दाखल केला जाऊ शकतो. परंतु, एक व्यक्ती अशीही आहे. जिला उत्तर कोरियात नियम मोडल्यास कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही. कोण आहे ही व्यक्ती याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 


सोशल मीडिया स्टार आहे आरम पॅन
> फोटोग्राफर आरम पॅन मूळचा सिंगापूरचा नागरिक असून तो एक सोशल मीडिया स्टार आहेत. फेसबूक, इंस्टाग्राम आणि युट्यूब अशा विविध ठिकाणी त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्या सर्व सोशल माध्यमांवर पॅन उत्तर कोरियाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. 
> या फोटोंमध्ये उत्तर कोरियाचे दैनंदिन आयुष्य दाखवण्यासोबतच अशीही काही ठिकाणे आहेत जेथे पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई आहे. पण, आरम पॅन आपला कॅमेरा घेऊन उत्तर कोरियात कुठेही जाऊ शकतो. कुठलेही फोटो आणि व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करू शकतो.


प्रोजेक्ट 360 डिग्री
> 2013 मध्ये त्याने सर्वप्रथम उत्तर कोरियाचा दौरा एक थ्रिल अनुभवण्यासाठी केला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 13 वेळा उत्तर कोरियाचा दौरा केला. त्याने आपल्या मोहिमेला प्रोजेक्ट 360 डिग्री असे नाव दिले आहे. पॅनने सांगितल्याप्रमाणे, प्रत्यक्षात पाहिलेला उत्तर कोरिया अपेक्षेपेक्षा खूप वेगळा होता. त्या ठिकाणी असे बरेच ठिकाण सापडले की जे साऱ्या जगाला दाखवावे असे वाटले. 
> त्यांच्या विविध सोशल मीडियावर वेब पेजवर दाखवलेला उत्तर कोरिया वेगळा आहे. अनेक माध्यमांमध्ये उत्तर कोरियाचे चित्र एक गरीब वेगळा पडलेला राष्ट्र असे दाखवले जाते. परंतु, पॅन यांच्या कॅमेऱ्यातून उत्तर कोरियात मोठ-मोठे शॉपिंग मॉल आणि गगनचुंबी इमारतींसह लोक कुटुंबासह पार्कमध्ये एन्जॉय करतानाही दिसून येतात. 
> त्यामध्ये सर्वात मोठा नियम पॅनने प्योंगयंगमध्ये मोडला होता. सीक्रेट देश म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या उत्तर कोरियाच्या राजधानीचा विमानातून त्याने 360 डिग्री व्हिडिओ तयार केला. तसेच तो इंटरनेटवर अपलोड देखील केला. यासाठी सुद्धा पॅनवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही.


हे आहे कारण...
पॅनने नुकतेच माध्यमांशी संवाद साधताना उत्तर कोरियात मिळणाऱ्या खुल्या सूटचे रहस्य उलगडले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, उत्तर कोरियातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी आपले काम पटवून दिले. त्यामुळेच सरकारकडून त्यांना 360 डिग्री व्हिडिओसह विविध ठिकाणांचे फोटो काढण्याची आणि कुठेही जाण्याची परवानगी मिळाली. आपण स्वतःच आचारसंहिता पाळतो. त्यामुळे, उत्तर कोरियाकडून सेन्सॉरशिपचा प्रश्नच राहत नाही. सोबतच जगभरात कुप्रसिद्धी होत असताना एखाद्या देशाची चांगली प्रतिमा तयार होत असेल तर त्याला कोणते सरकार नकार देणार?


पुढील स्लाइड्सवर पाहा, पॅन यांनी टिपलेले उत्तर कोरियाचे खास फोटो...

बातम्या आणखी आहेत...