आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम देशात 15 भारतीयांना फाशीपासून वाचवणारा मसीहा; स्वतःच दिला Blood Money

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसपी सिंग ओबेरॉय - Divya Marathi
एसपी सिंग ओबेरॉय

इंटरनॅशनल डेस्क - दुबईतील शिख उद्योजक एसपी सिंग ओबेरॉय यांनी 15 भारतीयांना फाशीपासून वाचवले आहे. या सर्वांच्या विरोधात दारुचा व्यापार आणि हत्येचे आरोप लावले होते. त्याच प्रकरणी यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला होता. त्या सर्वांची सुटका या उद्योजकाने ब्लडमनी देऊन केली आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये ब्लडमनी दिल्यानंतर सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात सुनावलेली शिक्षा रद्द केली जाऊ शकते. यात मृतांच्या किंवा पीडितांच्या कुटुंबियांना ठराविक अशी रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. सुटका झालेल्या 15 भारतीयांपैकी 14 पंजाबी शिख असून एक बिहारचा रहिवासी आहे. 


- या सर्वांच्या सुटकेनंतर एसपी सिंग ओबेरॉय यांनी त्यांच्यासह एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले, दुबईत अवैध मद्य व्यापार, तस्करी होताना विविध गटांमध्ये संघर्ष होतो. यात चुकूनही कुणाचा मृत्यू झाल्यास येथील कायदे इतके कठोर आहेत, की दोषीला फाशी दिली जाते. 
- सुटका झालेल्या भारतीयांवर ते म्हणाले, की यापैकी 5 जणांना शारजाह येथे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना यूपीच्या आजमगड येथील वीरेंद्र चौहानच्या हत्येप्रकरणी दोषी मानले होते. उर्वरीत 10 जणांना अबु धाबी येथे पाकिस्तानी नागरिक मोहम्मद फरहानच्या हत्येप्रकरणी मृत्यूदंड सुनावला होता. त्यांचा निकाल ऑक्टोबर 2016 मध्ये लागला होता. 
- ओबेरॉय म्हणाले, मृतांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला. कायद्यानुसार, ब्लडमनी घेण्यासाठी त्यांना तयार केले. त्यांच्या 'सरबत दा भला' या ट्रस्टमार्फत या सर्वांच्या सुटकेसाठी मोठी किंमत मोजली आहे. यानंतर संयुक्त अरब अमिरातच्या न्यायालयाने त्या दोषींची सुटका केली. 


आतापर्यंत 93 भारतीयांना वाचवले...
एसपी सिंग मूळचे पंजाबचे राहणारे आहेत. दुबईच्या ग्रँड हॉटेल आणि अॅपेक्स ग्रुप ऑफ कंपनीजचे ते मालक आहेत. त्यांनी आतापर्यंत यूएईमध्ये मृत्यूदंड सुनावलेल्या 93 भारतीयांना वाचवले आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी त्यांच्या ट्रस्टने जवळपास 20 कोटी रुपये खर्च केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...