आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात अशा अनेक जागा असतात, ज्यांची चर्चा त्याठिकाणच्या महिलांच्या सौंदर्यासाठी केली जाते. आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाबाबत माहिती देणार आहोत, ज्या ठिकाणच्या महिलांचे सौंदर्य अभिनेत्रींनाही मागे टाकू शकते. आम्ही चर्चा करतोय पाकिस्तानच्या काराकोरमच्या डोंगरांमध्ये राहणाऱ्या हुंजा जातीची. केवळ सौंदर्यासाठीच या महिला प्रसिद्ध नाहीत, तर येथील महिला वयाच्या 65 व्या वर्षीही मुले जन्माला घालतात.
जाणून घ्या आणखी काही..
- उत्तर पाकिस्तानच्या काराकोरमच्या डोंगरांमध्ये वसलेल्या महिलांची संख्या जवळपास 87 आहे. या महिला दिसायला त्यांच्या खऱ्या वयापेक्षा फार कमी वयाच्या दिसतात.
- हुंजा समुदायाचे लोक शारिरीक आणि मानसिकदृष्टा बळकट असतात. येथील महिला वयाच्या 65 व्या वर्षीही मुलांना जन्म देतात. त्याबद्दल त्यांना काही अडचणही नसते. तसेच या समुदायातील पुरुष वयाच्या नव्वदीतही पिता बनू शकतात.
- इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्यांमध्ये यांचे आयुर्मान साधारणपणे सर्वात जास्त आहे. या जातीचे लोक सुमारे 120 वर्षे जगतात. त्यांची जीवनशैली हेच त्यांच्या दीर्घायूपणाचे रहस्य आहे. हे लोक पहाटे 5 वाजता उठतात आणि भरपूर पायी फिरतात.
- हे लोक आजारीही कमी पडतात. त्याचे कारण म्हणजे, त्यांचे आहारावर विशेष लक्ष असते. हे लोक दिवसातून केवळ दोन वेळा जेवतात असे सांगितले जाते.
- हुंजा जातीचे लोक स्वतः पिकवलेलेच अन्न कातात. येथील लोक रोज अक्रोड खातात. त्यांचे दूध, फळे, लोणी सर्वकाही शुद्ध स्वरुपाचे असते. बागेत किंवा शेतीत किटकनाशकांचा वापर करण्यास या समाजात बंदी असते.
- हुंजा व्हॅली पाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
- जगभरातील लोक येथील डोंगरांमध्ये लपलेले सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा हुंजा समुदायातील महिलांचे सौंदर्य दाखवणारे आणखी काही Photos..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.