आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिशांचे गुलाम होते शाही घराण्याच्या सुनेचे पूर्वज; पंजोबा होते सफाई कामगार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटनच्या शाही घराण्याची सून झालेली मेघन मार्कल पहिली हाफ ब्लॅक ब्रिटिश रॉयल झाली आहे. प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेघनचे वडील श्वेत आणि आई अश्वेत आहेत. अर्थातच ती हाफ ब्लॅक आहे. प्रिन्स हॅरी त्या घराण्याचे वंशज आहेत, ज्यांनी एकेकाळी भारतासह निम्म्या जगावर राज्य केले. तर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री मेघन मार्कलच्या पूर्वजांना एकेकाळी गुलाम बनवून अमेरिकेत सफाई कामांसाठी आणले होते. मेघनच्या पंजोबांनी आपले अख्खे आयुष्य एक गुलाम आणि सफाई कामगार म्हणून घालवले. त्यांनी टेलरिंगचे काम सुद्धा केले आहे. कुणी कल्पनाही करू शकत नव्हते ती गोष्ट आता ब्रिटनच्या शाही परिवारात घडून आली आहे. 

 

पंजोबांचे अख्खे आयुष्य गुलामगिरीत...

- ब्रिटिश वेबसाइट डेलीमेलच्या वृत्तानुसार, वेबसाइटने मेघन मार्कलच्या पूर्वजांचा इतिहास काढण्यासाठी त्यावर संशोधन करण्यासाठी मॅसाच्युसेट्सच्या एलिजाबेथ बनास नामक जिओलॉजिस्टला कामावर लावले होते. 
- बनास यांनी आपल्या संशोधनात हा खुलासा केला, की मेघनच्या आईचे पूर्वज ब्लॅक आणि व्हाइट असे दोन्ही समाजातून होते. तसेच गेल्या कित्येक पिढ्या त्यांनी गुलामगिरीत काढल्या. 
- मेघनचे कुटुंबीय सध्या अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहत असले तरीही त्यांची नाळ जॉर्जियाशी जुळलेली आहे. मेघनचे पंजोबा (आईचे आजोबा) स्टीव्ह आर रागलंड चेट्टानूगाच्या एका क्लीनिंग शॉपमध्ये प्रेसर अर्थात सफाई कामगार म्हणून काम करत होते. 
- तसेच मेघनच्या पंजोबांचे पंजोबा जेरेमियाह रागलंड 1881 मध्ये जॉर्जियात जन्मले होते. त्यांच्या आई टेक्सासच्या श्वेतवर्णीय होत्या. तर वडील अश्वेत होते. 
- बनासने सांगितल्याप्रमाणे, जेरेमिया एक टेलर होते. त्यांचे टेलरिंगचे दुकान होते. तर त्यांच्या पत्नी क्लॉडिया स्टोरमध्ये स्वच्छतेची कामे करत होत्या. 
- यानंतर मेघनचे वडील एक श्वेत वर्णीय सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांनी 80 च्या दशकात अमेरिकेतील प्रसिद्ध शो मॅरिड साठी काम केले होते. 


आईसोबतच गेले लहानपण
- अमेरिकन टीव्ही शो सूट्समध्ये आपल्या अॅक्टिंग प्रसिद्ध झालेली मेघन लॉस एंजेलिस शहरात वाढली. ती फक्त 6 वर्षांची होती, जेव्हा तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला. यानंतर तिने आईसोबतच आपले लहानपण घालवले. 
- मेघनने नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीतून 2003 मध्ये कम्युनिकेशन्सची पदवी घेतली. अवघ्या 11 वर्षांची असताना तिने एका साबणाच्या जाहिरातीत महिलेला उत्तेजक दाखवल्या प्रकरणी हिलेरी क्लिंटन यांना पत्र लिहिले होते. 


अॅक्टिंग आणि मॉडेलिंग
- मार्कलने करिअरच्या सुरुवातीला कॅलिग्राफीत काम केले. यात तिने आपल्या राइटिंग आणि वेडिंग इनव्हिटेशन लिहिण्याचे स्किल्स वाढवले.
- यानंतर तिला अॅक्टिंग करण्याची संधी मिळाली. तिने सूट्स, द ग्रीक, रिमेंबर मी आणि हॉरिबल बॉसेस या प्रसिद्ध टीव्ही शोजमध्ये काम केले. यानंतर मॉडेलिंग सुद्धा केली. 
- लग्नापूर्वी ती टोरॉन्टो येथे शिफ्ट झाली होती. हॅरी आणि तिची पहिली भेट जुलै 2016 मध्ये झाली होती. याच्या काही दिवसांतच दोघांच्या अफेअरच्या चर्चा उडाल्या. 


प्रिन्स हॅरी दुसरा पती
प्रिन्स हॅरीचा हा पहिला विवाह असला तरीही मेघनचा हा दुसरा विवाह आहे. 2011 मध्ये तिने हॉलिवूड अॅक्टर आणि प्रोड्यूसर ट्रेव्होर अँगल्सनशी विवाह केला होता. 7 वर्षांच्या डेटिंगनंतर हे लग्न जुळले होते. पण, दोन वर्षांतच 2013 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, मेघनच्या कुटुंबियांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...