आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Saudi Arab: महिलांना मिळाला कार ड्रायव्हिंगचा अधिकार; पुरुषांनी गाड्या पेटवल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियाध - सौदी अरेबियातील मक्का शहरात काही लोकांनी एका महिलेच्या कारला आग लावली. महिलांना कार चालवण्याची परवानगी देणे इस्लामविरोधी असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही त्यांनी महिलेला कार चालवण्यास रोखले होते. तसेच जिवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या. 24 जून रोजी या देशात महिलांना कार चालवण्याचा अधिकार देण्यात आला. तसेच अनेक महिलांना चालक परवाने देण्यात आले. 

 

काय म्हणाली महिला..?

मक्का शहरात राहणाऱ्या सलमा-अल-शारीने स्थानिक दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात महिलांवरून कार चालवण्याची बंदी हटवण्यात आली. तेव्हापासूनच तिने ड्रायव्हिंगला सुरुवात केली होती. आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना कारमध्ये ये-जा करण्यात ती मदत करत होती. 


प्रशासनाने गिफ्ट केली नवीन कार
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मक्का शहराच्या उप-राज्यपालांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तसेच घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर सलमाची गाडी जाळल्यानंतर तिला नवीन गाडी गिफ्ट सुद्धा केली आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, महिलांना ड्रायव्हिंगचा अधिकार मिळाल्याचे बहुतांश पुरुष समर्थन करत आहेत. परंतु, काही पुरुष या निर्णयाच्या विरोधात आहेत. सलमाची कार जाळण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी 2 स्थानिकांना अटक केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...