आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही कोरियांत लष्करी संवाद, ऑलिम्पिकसाठी उन तयार! ऑलिम्पिकमध्ये संघ पाठवण्याची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल- दक्षिण आणि उत्तर कोरियांतील शत्रूत्व मिटून दोन्ही देशांची वाटचाल मैत्रीकडे सुरू झाली आहे. मंगळवारी उभय देशांत दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही देशांनी लष्करी पातळीवर संवाद प्रणाली सुरू करण्यास सहमती दाखवली आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उत्तर कोरियाने यजमान दक्षिण कोरियात आपला संघ पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.


कोरियांतील ही बैठक तणाव निवळण्याच्या दृष्टीने सुचिन्ह मानले जात आहे. उत्तर कोरियाच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत कोरियाच्या शिष्टमंडळाने ऑलिम्पिकचा संघ, अधिकारी, खेळाडू, चिअरलिडर्स, पत्रकार यांना दक्षिण कोरियात पाठवण्यात येईल, अशी तयारी दर्शवल्याची माहिती दक्षिण कोरियाचे मंत्री चुन हे-संग यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. ही चर्चा सीमेवरील पनमुंजॉम गावात आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांतील शांतता वाटाघाटी मंगळवारी सायंकाळी सुरू झाल्या. यापूर्वी देखील दोन्ही देशांत चर्चा झाली होती. ती चर्चाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


वास्तविक उत्तर कोरिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत अत्यंत कमकुवत आहे. गेल्या वेळच्या स्पर्धेत उत्तर कोरियाचा एकमेव खेळाडू अॅथलिटिक्समध्ये पात्र ठरला होता. उत्तर कोरियासाठी ऑलिम्पिकचे दारे केव्हाही उघडी आहेत, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सोमवारीच स्पष्ट केले होते.

 

वाटाघाटीतील महत्त्वाचे मुद्दे

- युद्धामुळे वेगळ्या झालेल्या कुटुंबांच्या भेटीसाठी दक्षिण कोरिया आग्रही

- दोन्ही कोरियांनी सातत्याने संपर्कात राहून शांतता प्रस्थापित करण्यावर उत्तर कोरियाचा भर.

 

आंतरराष्ट्रीय दबाव कमी करण्यासाठी उन यांचे तडजोडीचे अस्त्र

उत्तर कोरियाशी जुळवून घेऊन हुकूमशहा किम जाेंग उन यांनी अमेरिकेच्या विरोधात आणखी एक चाल खेळली असावी, असे बोलले जाते. दक्षिण कोरियासोबत जवळीक केल्याने क्षेपणास्त्र चाचणीवरून िनर्माण झालेला तणाव काही प्रमाणात का होईना कमी करण्याचा उद्देश उन यांच्या या भूमिकेमागे असावा, असे तज्ञांचे मत आहे.


धावपटूंना पाठवण्याची तयारी
उत्तर कोरियाने ९ ते २५ फेब्रुवारीदरम्यान आपल्या धावपटूंना दक्षिण कोरियात पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. उभय देशातील वाटाघाटीत पाच जणांचा समावेश होता. त्यापैकी असलेल्या चुन यांनी कोरियाच्या नव्या भूमिकेला जाहीर केले. कोरियाला ऑलिम्पिकमध्ये फारसे यश नाही. 

 

२०१५ मध्ये ४० तासांचा खल, तरीही चर्चा झाली होती निष्फळ
दोन्ही कोरियांतील शत्रूत्व सर्वश्रूत आहे. परंतु २०१५ मध्ये तडजोडीचा प्रयत्न झाला होता. वार्ताकारांत ४० तास खल चालला होता. मात्र कोणत्याही मुद्दयावर तडजोड झाली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी सुरू झालेली चर्चा महत्त्वाची मानली जात होती. त्यात काही मुद्द्यावर झटपट सहमती झाल्याने क्षेत्रीय पातळीवर ही सुखद बातमी ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...