आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरियातील सैन्य अमेरिका परत घेणार, ट्रम्प यांचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - उत्तर व दक्षिण कोरियातील संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेने या प्रदेशातील सैनिक काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनला(संरक्षण विभागाचे मुख्यालय) दक्षिण कोरियात तैनात सैनिकांना परत बोलावण्याचा पर्याय तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

 

दोन्ही कोरियाई नेत्यांमधील ऐतिहासिक चर्चेनंतर संबंध सुधारण्याची आशा आहे. ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यात या महिन्यात चर्चा होणार आहे. किम यांनी उत्तर कोरियाला अण्वस्त्रमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.  


अमेरिकी प्रसारमाध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, कोरियाई प्रदेशात अमेरिकी सैनिकांच्या संख्येत कपात करण्याच्या निर्णयाचा अर्थ असा नव्हे की, यावरून किम व ट्रम्प यांच्यातील चर्चेत कोणत्या प्रकारचा करार होईल. असे असले तरी दोन्ही कोरियाई देशांमध्ये शांतता करारामुळे २८,५०० सैनिकांच्या तैनातीची आवश्यकता नसेल.

 

अमेरिकी अधिकाऱ्यांनुसार, ट्रम्प दक्षिण कोरियातून सैनिकांना बोलावण्याच्या बाजूने आहेत. अमेरिकेने सैनिकांच्या तैनातीचा आणखी खर्च उचलू नये, असे त्यांना वाटते. संबंधित सैनिक प्रामुख्याने जपानची सुरक्षा करत आहेत.  

 

लष्करावरून अमेरिका, द. कोरियात करार   
एका करारान्वये दक्षिण कोरिया दरवर्षी सैनिकांवर होणारा जवळपास अर्धा खर्च(८० कोटी डॉलरपेक्षा जास्त) उचलतो. असे असले तरी ट्रम्प प्रशासनाच्या मागणीनुसार, त्यांनी सैनिकांच्या तैनातीवरील सर्व खर्च उचलला पाहिजे. हा करार २०१८ च्या अखेरीस समाप्त होत आहे.  

 

चीनच्या क्षेपणास्त्र प्रणालीवर संताप

दक्षिण चीन सागरात क्षेपणास्त्र प्रणाली लावण्यासोबत लष्करी तळ केल्याबद्दल अमेरिकेने चीनला इशारा दिला आहे. अमेरिकेने म्हटले की, चीनला याचे परिणाम भोगावे लागतील. व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स म्हणाल्या, दक्षिण चीन सागरात चीनच्या लष्करी हालचाली जाणून आहोत. हा मुद्दा चीनच्या नेतृत्वासमोर उपस्थित केला आहे. पेंटागॉनच्या मुख्य प्रवक्त्या डाना व्हाइट म्हणाल्या, हे क्षेत्र नौकानयनासाठी मुक्त केले आहे हे चीनला समजायला पाहिजे. आम्ही सर्वांच्या हिताच्या बाजूने आहोत व अमेरिकी नौदल यास जबाबदार आहे.  चीनने आदल्या लष्करी हालचालींना योग्य ठरवल्या. चीनने द. चीन सागरात ३ ठिकाणी जहाजविरोधी क्षेपणास्त्र तैनात केले आहेत.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...