आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात पोहोचत नव्हता सूर्यप्रकाश, मग शास्त्रज्ञांनी जन्माला घातला \'नवा सूर्य\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंजिनियर्सने अनोख्‍या पध्‍दतीने शहरासाठी काचेच्या मदतीने 'नवा सूर्या'ची निर्मिती केली. - Divya Marathi
इंजिनियर्सने अनोख्‍या पध्‍दतीने शहरासाठी काचेच्या मदतीने 'नवा सूर्या'ची निर्मिती केली.

इंटरनॅशनल डेस्क- नॉर्वेतील जुकान शहराच्या नागरिकांनी कधी सूर्यप्रकाशच पाहिलेला नव्हता. पर्वतांनी घेरलेल्या या ठिकाणी हिवाळ्यात सूर्यकिरणे पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संच्या टीमने यावर काही करता येईल का याची चाचपणी सुरू केली. अखेर पाच वर्षापूर्वी या शहरासाठी काचेच्या मदतीने अनोख्‍या पध्‍दतीने 'नव्या सूर्या'ची निर्मिती केली. कशी केली नव्या कृत्रिम सुर्याची निर्मिती....

 

- वास्तविक नॉर्वेतील जुकान नावाचे शहर पर्वतांच्या मधोमध आहे. हे शहर आसपासच्या पर्वतांनी झाकलेले असते.
- या समस्याबाबत इंजिनिअर्संनी सुचवलेल्या उपायावर येथील व्यवस्थापकांनी असे काच लावली ज्यांच्या मदतीने सूर्यकिरणे लोकांपर्यंत जातील. 
- काचा पर्वतावर लावली गेली आहेत. ती स्वत: एका सूर्याप्रमाणे दिसतात. तिचे किरणे थेट स्कवायर पडतात. यामुळे दररोज दिवसा लोक येथे प्रचंड गर्दी करत असतात.
- यात काही सौरऊर्जा पॅनेल्सही लावली गेली आहेत. ती संगणकाशी जोडलेली आहेत. याने काचा दररोज आपोआप स्वच्छ राहतात आणि धुतलीही जातात. 
- सूर्याच्या स्थितीनुसार काचा फिरवल्या जातात. यामुळे शहरातील प्रत्येक भागात सूर्यप्रकाश पोहोचतो.

 

पुढील स्लाईड्सवर पाहा, जुकान शहरातील छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...