आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 नराधमांनी माझ्यावर अत्याचार केला! Help Me\' पीडितेने सांगितली आपबिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - मॉडेलिंग इंडस्ट्रीत जाण्यासाठी आणि तेथे टिकण्यासाठी कोरियातील तरुणींना कशा नरक यातनेतून जावे लागते याची हकीगत एका कोरियन मॉडेलने समोर आणली. आपल्यावर जे बेतले ते दुसरे कुणासोबतही घडू नये या हेतून तिने एक युट्यूब व्हिडिओ पोस्ट केला आहे. कथित मॉडेलिंगचे फोटोशूट सुरू असताना तब्बल 20 पुरुष मॉडेल तिच्या अब्रूचे कसे लचके तोडत होते त्याचे वर्णन तिने केले. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 43 लाख लोकांनी पाहिला. तसेच वकील आणि सेलिब्रिटीज तिच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सोबतच तिला न्याय मिळवून देण्यासाठी देशव्यापी मोहिम सुद्ध सुरू झाली आहे. 

 

ते व्हायरल न्यूड फोटो माझेच!
दक्षिण कोरियात राहणारी युट्यूब स्टार यांग ये वोन हिच्या नावाने सोशल मीडियावर न्यूड फोटो व्हायरल होत आहेत. लोकांसह तिच्या मित्र परिवारांनी सुद्धा तिच्यावर टीका सुरू केल्या आहेत. त्यावर खुलासा करताना या युट्यूब स्टारने ते न्यूड फोटो आपलेच असल्याची कबुली दिली. सोबतच, ते व्हायरल कसे झाले याचा संपूर्ण खुलासा तिने 25 मिनिटांच्या युट्यूब व्हिडिओमध्ये केला आहे.


काय आहे या व्हिडिओमध्ये..?
> दक्षिण कोरियात युट्यूबर म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या यांग या तरुणीने आपल्यासोबत घडलेला प्रकार 25 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये जगजाहीर केला. युट्यूब स्टार होण्यापूर्वी अॅक्टिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात नशीब अजमावताना तिच्यासोबत जो प्रकार घडला तोच तिने 16 मे 2018 रोजी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये मांडला आहे. 
> 3 वर्षांपूर्वी ती एक स्ट्रगलिंग मॉडेल होती. त्याच दरम्यान एका स्टुडिओने तिला मुलाखतीसाठी बोलावले. निवड झाल्यानंतर तिला पार्ट टाईम मॉडेलची जॉब देण्यात आली. तसेच एका करारावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. हीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली.
> करारात स्टुडिओतील डिरेक्टरने यांग ये वोनसोबत 5 फोटोशूट करणार असे स्पष्ट केले. ते सगळेच विविध प्रकारचे असतील. तसेच त्यापैकी एक फोटोशूट सेक्सी असेल असे तिला सांगण्यात आले होते. तिने डिरेक्टरला त्याचा अर्थ देखील विचारला. तेव्हा अॅक्टर होत असताना सगळेच सेलिब्रिटी हॉट फोटोशूट करतात तशाच प्रकारचा नॉर्मल फोटोशूट असेल असे त्याने सांगितले. 
> यांग सांगितलेल्या वेळेनुसार स्टुडिओमध्ये पोहोचली. फोटोशूट संदर्भात ती उत्साही होती. त्याचवेळी 20 पुरुष स्टुडिओमध्ये शिरले आणि तिच्यावर घेराव घातला. ती प्रचंड घाबरली होती. सुरुवातीला काही फोटोज काढण्यात आले. यानंतर डिरेक्टरने तिला टॉप काढण्याचे सांगितले. नकार दिला तेव्हा सगळ्यांनी तिच्यावर बळजबरी सुरू केली. तसेच मनोरंजन क्षेत्राची दारे नेहमीसाठी बंद करू आणि करार मोडल्याच्या आरोपांत खटला दाखल करू अशा धमक्या दिल्या. 
> कोरियात मॉडेलिंग एजन्सी आणि स्टुडिओंकडून मॉडेल्स आणि अॅक्टर्सच्या विरोधात खटले दाखल करून पैसे वसूल केल्याची उदाहरणे आहेत. तसेच स्टुडिओतील लोक तिच्यावर इतकी दमदाटी करत होते की आपला बलात्कार होईल किंवा हे लोक आपल्याला मारून टाकतील अशी भिती तिला वाटत होती. त्यामुळे, तिने जीव वाचवण्यासाठी सर्व ऐकण्यातच बरे समजले.
> डिरेक्टरच्या सांगण्यावरून तिने आपला टॉप काढला. ती अर्धनग्न अवस्थेत हातांनी स्वतःची अब्रू झाकण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी ते 20 नराधम तिच्या अंगाला विविध ठिकाणी स्पर्श करत होते. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती, त्याचवेळी डिरेक्टर जोरात ओरडून जीभ बाहेर काढण्यास सांगितले आणि फोटो काढणे सुरूच होते. 
> हा प्रकार सांगत असताना वोन अचानक भावूक झाली. आणि पुढे म्हणाली, "माझे अश्रू थांबत नव्हते हात-पाय आणि अख्खे शरीर थर-थर कापत होते. यानंतर मला सगळेच कपडे काढण्यास सांगितले गेले. त्यानंतरही ते लोक थांबले नाहीत. सगळेच मिळून माझा लैंगिक छळ करत होते. डिरेक्टर वेळोवेळी मला स्माइल करण्यास सांगत होता. मी काहीच करू शकले नाही. फक्त जगण्यासाठी आदेशांचे पालन करत होते."


माझ्यावर जे बेतले ते कुणासोबतही घडू नये
हे सर्व सांगत असताना तिचे अश्रू थांबत नाहीत. आपल्या व्हिडिओमध्ये सश्रू नयनांनी ती सांगते, "मनोरंजन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या असंख्य महिलांची हीच कहाणी आहे. पण, माझ्यासोबत जे काही घडले ते यापुढे कुणासोबतही घडू नये. कुठल्याही एजंसीसोबत करार करताना नीट वाचा. जागृक राहा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, अशा नराधमांपासून सदैव सावध राहा. या व्हिडिओनंतर अनेक तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. मलाही वाचवा."


स्टुडिओ म्हणे, होय काढले फोटो
काहींना या तरुणीवर संशय देखील आला. पण, तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित स्टुडिओकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्या स्टुडिओने यान ये वोनचे त्या अवस्थेतील फोटो काढल्याची कबुली दिली आहे. मात्र, हे सर्व काही तिच्या मर्जीने झाले असा दावा त्यांनी केला. सोबतच, तिचे न्यूड फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सने ती छायाचित्रे स्वतःकडे खासगी कलेक्शनसाठी ठेवणार असे आश्वासन दिले होते. आपल्या स्टुडिओने किंवा फोटोग्राफरने ते व्हायरल केले नाहीत असा दावा सुद्धा त्या स्टुडिओने केला आहे. 


सोशल मीडियावर, संताप स्वाक्षरी मोहिम
या व्हिडिओने दक्षिण कोरियात देशव्यापी मोहिम सुरू केली आहे. केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. अनेक नागरिक या महिलेच्या समर्थनात उतरले. त्यापैकीच काहींनी त्या स्टुडिओवर कठोर कारवाईसाठी स्वाक्षरी मोहिम सुरू केली. सरकारी दखल घेण्यासाठी 2 लाख स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत. आतापर्यंत या अपीलवर 1 लाख 55 हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्या सर्वांनीच दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

 

पुढील स्लाइडवर, सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया...

 

बातम्या आणखी आहेत...