आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी, शेख हसीना आणि ममता बॅनर्जी 25 मे रोजी विश्वभारतीच्या मंचावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांतिनिकेतन - पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वभारती विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील या वेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. या वेळी बांगलादेश भवनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या केंद्रीय इमारतीजवळ बांगलादेश भवनची उभारणी झाली आहे.  


विश्वभारती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू साबुखोली सेन यांनी ही माहिती पत्रपरिषदेत दिली. बांगलादेश भवनचे उद्घाटन शेख हसीनांच्या हस्ते करण्यात येईल. या भवनात बांगलादेशशी संबंधित ऐतिहासिक दस्तएेवजांचे जतन केले आहे. बांगलादेश निर्मितीच्या काळातले दस्तऐवज यात आहेत.

बातम्या आणखी आहेत...