आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिन्यात मोदींचा दुसरा चीन दौरा; जिनपिंगसह 5 नेत्यांशी चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली /क्विंगदाआे - पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीआे) संमेलनात सहभागी होण्यासाठी शनिवारी चीनच्या क्विंगदाआे शहरात पोहोचतील. दीड महिन्यातील त्यांचा हा दुसरा चीन दौरा आहे. या अगोदर एप्रिलमध्ये अनौपचारिक बैठकीसाठी ते चीन भेटीवर गेले होते. मोदी संमेलनादरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व अन्य ४ देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा करतील.

 

एससीआेची मुख्य बैठक १० जून रोजी होणार आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहाणी पर्यवेक्षक देशांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून संमेलनात सहभागी होतील. अमेरिकेसोबतचा सौदा फिसकटल्याने इराणच्या अणु कार्यक्रमास चीन, रशिया, भारत पाठिंबाही जाहीर करू शकतात. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, मोदी व जिनपिंग वुहानमधील निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतील.मोदी दहशतवादावरील कारवाईचा मुद्दा उपस्थित करू शकतील. 

 

युरेशियाची ६०% जमीन
एससीआे सदस्य राष्ट्रांकडे युरेशियन देशांची एकूण ६० टक्के जमिन आहे. या देशांत जगातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या राहते. या सदस्य देशांकडे जगातील सुमारे २० टक्के जीडीपी आहे. चीनमध्ये संमेलनाचे आयोजनाची ही चौथी वेळ आहे. एससीआेचे सदस्य राष्ट्र यावेळी नवीन संबंधासाठी पुढाकार घेऊ शकतात. त्याचा उद्देश- ‘ ना तडजोड, ना वाद, ना तिसऱ्या देशाविरूद्ध भूमिका’ असा राहील. 

 

हे आहेत सदस्य 
शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना  २००१ मध्ये रशिया, चीन, किर्गीस्तान, कझाकिस्तान, तझाकिस्तान व उज्बेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी केली होती. युरेशियातील देशांत राजनैयिक, आर्थिक व सामरिक सहयोग वाढवण्यासाठी स्थापना झाली. भारत व पाकिस्तानला गत वर्षी याचे सदस्यत्व मिळाले होते. 

 

> उद्दिष्ट: संरक्षण सहकार्य, आर्थिक विकास, सांस्कृतिक मदत 

सुरक्षा: दहशतवाद, कट्टरवादाविरुद्ध एकजूट

सदस्य राष्ट्रांच्या संरक्षणासी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रीत करणे हे एससीआेचेे उद्दिष्ट आहे. दहशतवाद, कट्टरवाद, फुटीरवाद यांच्याविरुद्ध एकजूट करणे. एससीआेने सामुहिक सुरक्षा संघटनेची स्थापना केली होती. एससीआेने ६०० दहशतवादी कटांना उधळून लावले. ५०० अतिरेक्यांनी प्रत्यपर्पण केले. 

 

अर्थ: भारत, रशियाचा सर्वाधिक व्यापार चीनसोबत

एससीआे आर्थिक सहकार्य वाढवण्यावरही काम करत आहे. सदस्य देशांत मुक्त व्यापार, पुरवठ्यात सुलभता वाढवणे हा उद्देश. चीन सदस्य राष्ट्रांना १० अब्ज डॉलरचे सहकार्य करणार. २०१७ मध्ये भारत-चीन दरम्यान ८४ अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार झाला होता. रशियासोबत ३१.१ टक्के व द्विपक्षीय व्यापार वाढवणार. 

 

सांस्कृृतिक:कला प्रदर्शनाचेही आयोजन

२००२ मध्ये सदस्य देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांची बीजिंगमध्ये बैठक झाली होती. २००५ मध्ये एसीसीआेच्या कला महोत्सवाचे पहिल्यांदाच आयोजन. दरवर्षी सांस्कृतिक आदान-प्रदान वाढवण्यावर सहमती. यंदाच्या संमेेलनातही चर्चा होणार आहे. २००८ पासून लोककलेचे आयोजन. 

 

बातम्या आणखी आहेत...