आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडपासून सौदी पर्यंत धर्माच्या नावे चिमुकल्यांचे शोषण करणारे भोंदू बाबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अल्पवयीन मुलीनवर अत्याचार प्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू आसारामला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. लोकांच्या धार्मिक भावना, त्यांच्या आस्थेशी खेळ करणे न्यायालयाने गंभीर गुन्हा मानले आहे. धर्माच्या नावे लहान मुला-मुलींसोबत अश्लील आणि अत्याचार करणारे भोंदू बाबा जगभरात आहेत. कित्येक वर्ष त्यांनी धार्मिक प्रवचन देणे आणि धर्माची शिकवण देण्याचा ढोंग केला. मात्र, अखेर त्या भोंदू बाबांचा भांडाफोड झालाच. कुणी पादरी, कुणी मौलवी तर बौद्ध भिख्खू असल्याचा सोंग करून सैतानी कृत्य केले आहेत. divyamarathi.com आपल्याला अशाच भोंदू बाबांची माहिती देत आहे.


स्वयंघोषित भिख्खू सुकफोल
गतवर्षी अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एका बौद्ध भिख्खूचे नाव समोर आले होते. विरपोल सुकफोल असे त्याचे नाव असलेल्या या धर्मगुरूवर इतर गंभीर आरोप सुद्धा लावण्यात आले होते. 20 वर्षांचा असताना त्याने करोडोंची मालमत्ता जमवली होती. सुकफोलवर रेप, लैंगिक शोषण, हवाला, मनी लॉन्ड्रिंग, लहानग्यांचे अपहरण, बाल लैंगिक शोषण आणि आर्थिक गुन्हेगारीचे खटले होते. गतवर्षी त्याला अमेरिकेत अटक करून थायलंडला नेण्यात आले. 2013 पासून तो थायलंडमधून फरार होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अशीच आणखी धक्कादायक प्रकरणे...

बातम्या आणखी आहेत...