आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षीय मुलीसोबत Couple ने बनवला पॉर्न व्हिडिओ, 2 वर्षांपासून सुरू होता अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - लोक पैश्यांसाठी किती निच्च पातळीला जाऊ शकतात याचे उदाहरण समोर आले आहे. ऑस्ट्रेलिया पोलिसांनी युक्रेनच्या एका जोडप्याला अटक केली आहे. हे दोघे आपल्या आपल्या 4 वर्षीय मुलीला सोबत घेऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करून विकत होते. जगभरात सर्वात गंभीर गुन्ह्यांपैकी एक चाइल्ड पॉर्न तयार करणारे हे दोघे तो व्हिडिओ अवघ्या 70 डॉलरमध्ये (4800 रुपये) विकायचे. त्यांनी हे गलिच्छ कृत्य पैसे आणि बिटकॉइनसाठी केल्याची कबुली दिली. त्यांचा हा घाणेरडा कारभार गेल्या 2 वर्षांपासून सुरू होता. तेव्हा ही चिमुरडी फक्त 2 वर्षांची होती.


युक्रेनमध्ये ऑस्ट्रेलियन पोलिसांची कारवाई
पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्या जोपड्याला अटक करताना दिसून येत आहे. सोबतच घटनास्थळावरून चाइल्ड पॉर्नोग्राफीचे साहित्य, व्हिडिओ आणि फोटोंसह सेक्स टाइज सुद्धा पोलिसांनी जप्त केले. युक्रेनच्या या कपलची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच आधारे धाड टाकून त्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणातील जोडप्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही. 


असे पकडले
- युक्रेनच्या एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियन पोलिस आपल्या देशातील चाइल्ड पॉर्नोग्राफी रॅकेटचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना एक 4 वर्षीय मुलगी आणि पालकांचा पॉर्न व्हिडिओ सापडला. त्या व्हिडिओमध्ये एक बारकोड त्या अधिकाऱ्याला दिसून आला. बारकोडचा तपास केला असता तो युक्रेनच्या पोल्तोवा येथे तयार झाल्याचे समोर आले. 
- ऑस्ट्रेलियन पोलिसांनी वेळीच युक्रेनच्या पोलिस दलाशी संवाद साधला आणि मदत मागितली. त्याच बारकोडवरून एकाच ठिकाणावरून वारंवार चाइल्ड पॉर्नोग्राफी इंटरनेटवर अपलोड होत असल्याचे पोलिसांना कळाले. परंतु, वेळोवेळी पाठपुरावा घेतल्यानंतर युक्रेनच्या पोलिसांना त्या जोडप्याला पकडण्यात यश आले नाही. 
- यानंतर ऑस्ट्रेलियन पोलिसांनी स्वतः युक्रेनला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या सैतानी कपलला शोधून त्यांच्या फ्लॅटवर धाड टाकली. ते युक्रेनच्या क्रिव्यी येथील एका फ्लॅटमध्ये आपल्या 4 वर्षीय मुलीसोबत पलंगावर सापडले. त्यावेळी सुद्धा ते व्हिडिओ शूट करण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्या दोघांना अटक करून मुलीला उपचारासाठी पाठवले. 


दर 3 महिन्याला बदलत होते ठिकाण
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, युक्रेनचे पोलिस आपला शोध घेत असल्याचे त्या कपलला लक्षात आले होते. त्यांनी पत्ता लागताच आपले घर बदलले. पोल्तोवा शहरातून त्यांनी पळ काढला. यानंतर दर 3 महिन्यात त्यांनी आपले घर बदलण्यास सुरुवात केली. परंतु, ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या हातून ते वाचू शकले नाही. या दोघांना गंभीर शिक्षा मिळावी अशी मागणी केली जात आहे. सोबतच, त्यांचे ग्राहक कोण होते, याचाही शोध घेतला जात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...