आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात आधुनिकीकरणाएेवजी पगारावरच जास्त संरक्षण खर्च; जर्मनीपेक्षा जास्त तरतूद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वीडन - अमेरिका आणि चीननंतर आता शस्त्रास्त्रांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या रांगेत भारताचाही समावेश झाला आहे. भारताने संरक्षण क्षेत्रामध्ये २०१७ मध्ये ४.३४ लाख कोटी खर्च केले आहेत. याआधीच्या तुलनेत हा खर्च ५.५ टक्के जास्त आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. संरक्षण खर्चाबाबत एखाद्या दक्षिण आशियाई देशाने पहिल्यांदाच फ्रान्सला मागे टाकले आहे.

 

म्हणजेच संरक्षण क्षेत्रावरील खर्चात फ्रान्स आता सहाव्या, तर भारत पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र, भारतातील खर्च या क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर कमी व पगार, पेन्शनवरच जास्त आहे. जगभराचा विचार केल्यास या क्षेत्रातील खर्च १.१ टक्क्यांनी वाढून २०१७ मध्ये ११८.२५ लाख कोटींवर पोहोचला आहे. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतरचा हा सर्वाधिक खर्च असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगभरातील एकूण सैन्य खर्च ११५.९२ लाख कोटी रुपये असून यातील ६० टक्के वाटा हा भारत आणि चीनचा आहे. वर्ष २०१७ मध्ये सैन्यावर सर्वाधिक खर्च करण्याबाबत भारत, फ्रान्स, जर्मनीसारखे देश अव्वल ठरले आहेत.

 

भारताने खर्च वाढवण्याचे कारण
* आशियामधील तणाव वाढला आहे.  
* चीनमुळे अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात दबाव आहे.  
* भारतापेक्षा अनेक पटींनी जास्त खर्च चीनने केला आहे. चीनने संरक्षण क्षेत्रातील खर्चात १३ टक्के वाढ केली आहे.

 
पगार-निवृत्तिवेतनावर जास्त खर्च  
भारतीय सैन्यात १४ लाख लोकांना पगार व निवृत्तिवेतन दिले जाते. २० लाख वयोवृद्ध आहेत. ले. जनरल, शरतचंद्र यांनी संसदीय समितीला सांगितले की, संरक्षण क्षेत्रातील खर्चापैकी १४% रक्कम आधुनिकीकरणाच्या नावाने खर्च होते, तर ६३ टक्के रक्कम पगारावर खर्च होते.

 

भारताव्यतिरिक्त चार देश, जे संरक्षण क्षेत्रावर बराच खर्च करतात

 

देश सेविकांवरील खर्च  
१. अमेरिका -  ४०.६८ लाख कोटी रु.  
२.चीन -  १५.१९ लाख कोटी रु.  
३. सौदी अरेबिया -  ४.६० लाख कोटी रु.  
४. रशिया - ४.४० कोटी रु. 
 
२.६१ लाख कोटीच्या वार्षिक खर्चासह दक्षिण कोरिया १० व्या क्रमांकावर आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...