आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष भूषवत आहेत पुतिन; हजारो आंदोलक रस्त्यावर, 1600 जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियात सोमवारी व्लादिमीर पुतिन चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार सांभाळत आहेत. मात्र, त्याच्या एका दिवसापूर्वीच पुतिन यांच्या विरोधात हजारो आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. त्यांच्या चौथ्या कार्यकाळाचा ते विरोध करत आहेत. या विरोध प्रदर्शनांचे नेतृत्व पुतिन यांची कट्टर विरोधक अॅलेक्सी नवाल्नी करत आहेत. पोलिसांनी त्यांच्यासह त्यांच्या 1600 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. 


नवाल्नीला पोलिसांनी फरपटत नेले
- याकुत्सपासून ईशान्येतील सेंट पीट्सबर्गपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक आंदोलन करत आहेत. या सर्वच कार्यकर्त्यांचे नेते पुतिनविरोधक नवाल्नी आहेत. 
- पुश्किल स्क्वेयरवर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी नवाल्नी यांना फरपटत नेले. सरकार नियंत्रित माध्यमांवर त्याची बातमी सुद्धा लावण्यात आली नाही असे आरोप होत आहेत. नवाल्नी यांनी पोलिसांचे आदेश मानले नाहीत असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.
- हजारोंच्या संख्येने आंदोलक पुतिन यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप लावत आहेत. काहींनी तर पुतिन चक्क चोर असल्याचे फलक दाखवून आपला रोष व्यक्त केला. पुतिन कमकुवत आहेत, त्यांना सत्तेवर राहता येणार नाही अशा घोषणा देखील दिल्या.


77% टक्के मते मिळवून राष्ट्राध्यक्ष बनले पुतिन
- मार्चमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पुतिन यांना 77% टक्के मते मिळाली आहेत. रशियात जोसेफ स्टॅलिननंतर ते सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे नेते ठरले आहेत. 
- नवाल्नी यांनी त्यांना आव्हान दिले होते. पण, त्यांना उमेदवारी तर सोडाच मतदान करण्याची संधी सुद्धा देण्यात आली नाही. पुतिन यांनी मुद्दाम आपल्या विरोधकांना निवडणुकीपासून दूर ठेवले असा आरोप झाला. 
- व्लादिमीर पुतिन 2000, 2008 आणि 2012 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडले गेले. 2008-12 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. 
- सोव्हिएत संघाचे सर्वात मोठे नेते राहिलेले जोसेफ स्टॅलिन यांनी एकूण 30 वर्षे रशियाची सत्ता भोगली. त्यानंतर पुतिन आपला कार्यकाळ 2024 पर्यंत भोगतील अर्थातच तोपर्यंत त्यांनी रशियाच्या सत्तेवर 24 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला असेल. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...